S M L

अखेर समीर भुजबळांना जामीन मंजूर

Sachin Salve | Updated On: Jun 6, 2018 05:15 PM IST

अखेर समीर भुजबळांना जामीन मंजूर

मुंबई, 06 जून : : मनी लाँड्रिंग प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यापाठोपाठ अखेर त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांना जामीन मंजूर झालाय. मुंबई हायकोर्टाने 5 लाखांच्या जातमुचलक्यावर समीर भुजबळांना सशर्त जामीन मंजूर केलाय. त्यामुळे अडीच वर्षांनंतर समीर भुजबळ तुरुंगाबाहेर येणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी ईडीकडून 10 फेब्रुवारी 2016 रोजी अटक करण्यात आली होती. समीर भुजबळांना अटक झाल्यानंतर समीर भुजबळ यांच्यावर  यांच्यावर हवाला मार्गे काळा पैसा परदेशात पाठवल्याचा आरोप करण्यात आले. परदेशात खाण आणि पॉवर प्रकल्प असल्याचं सांगितलं होतं. तपासामध्ये हे सर्व प्रकल्प बोगस असल्याचं समोर आलंय.

याच बोगस कंपन्यांनी हजारो कोटी भारतामध्ये गुंतवले. प्रत्यक्षात हा पैसा हवालामार्गे भारतामध्ये परत आणला असल्याचं तपासात आढळलंय त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून समीर भुजबळ आर्थर रोड तुरुंगात होते.

दोन दिवसांपासून समीर भुजबळ यांच्या जामिनावर हायकोर्टात सुनावणी सुरू होती. ईडीने भुजबळांच्या जामिनाला विरोध केला होता. पण अखेर आज कोर्टाने भुजबळांना दिलासा देत सशर्त जामीन मंजूर केलाय. 5 लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला तसंच महाराष्ट्राबाहेर जाण्यास मनाई करण्यात आलीये. तसंच प्रत्येक चौकशीला कोर्टात हजर राहावे लागणार आहे अशा अटी भुजबळांना घालण्यात आल्या आहे.

'ईडी'चे समीर भुजबळांवर आरोप

Loading...
Loading...

- समीर भुजबळांची अटक त्यांच्याच कंपन्यांमधल्या कथित अफरातफरीमुळे

- भुजबळ कुटुंबीयांच्या 11 कंपन्यांमध्ये आर्थिक गैरव्यवहार ईडीला संशय

- आर्मस्ट्राँग प्युअर वॉटर, आर्मस्ट्राँग एनर्जी, शिराज वाईनयार्ड्स, इदीन फर्निचर

- व्हर्चुअल टूर्स, सुवी रबर, इंटलेक्चुअल मॅनेजमेंट कन्सलटंट्स

- भावेश बिल्डर्स, पर्वेश कन्स्ट्रक्शन, नीश इन्फ्रास्ट्रक्चर, देविशा इनफ्रास्ट्रक्चर

- अटक केल्यानंतरच काही कंपन्यांची कागदपत्रं सुपूर्द केली

- 2 महत्त्वाच्या कंपन्यांची कागदपत्रं अजूनही सुपूर्द केली नाहीयेत

- अनेक कंपन्यांचं वास्तवात काहीच काम नाही, फक्त आर्थिक देवाणघेवाण

- सर्व कंपन्यांमधून अत्यंत क्लिष्ट पद्धतीने पैसे फिरवण्यात आलेत

- महत्त्वाच्या कंपन्यांच्या भागधारक कंपन्या केवळ कागदावरच

- भागधारक कंपन्यांबद्दल काहीच ठाऊक नसल्याचा समीर भुजबळांचा दावा

- समीर भुजबळ चौकशीत सहकार्य करत नसल्याचा ईडीचा आरोप

- समीर भुजबळ जाणीवपूर्वक महत्त्वाची तथ्यं लपवत असल्याचा ईडीचा आरोप

- कोट्यवधी रुपयांची संपत्ती मुळात निर्माण कुठे झाली, हे सांगत नसल्याचा आरोप

'या' कायद्यामुळे जामीन मिळाला

नोव्हेंबर २०१७ मध्ये सुप्रीम कोर्टाने पीएमएलए कायद्यातील कलम ४५ घटनात्मकदृष्ट्या अवैध ठरवलं होतं. त्याच धर्तीवर छगन भुजबळ यांनी जामीन अर्ज केला आणि तो मंजूर करण्यात आला. तसाच जामीन अर्ज समीर यांनी देखील केला आहे. पीएमएलए कायद्यात २९ मार्च रोजी दुरुस्ती करण्यात आली असून त्यामुळे आता समीर यांना जामीन देता येणार नाही असा ईडीचा युक्तीवाद केला होता. पण अखेर याच कायद्याचा बदलामुळे समीर भुजबळ यांनाही तुरुंगाचे दार मोकळे झाले आहे.

हे पण वाचा !

महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी 'ईडी'कडून समीर भुजबळांना अटक

चौकशी करा, पण अटक करणं अयोग्य - भुजबळ

छगन भुजबळ 10 जूनला पुण्यात करणार भाषण

पंकज भुजबळांनी घेतली मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट

भुजबळांची 'दुसरी इनिंग', भायखळ्यात घेणार सोमवारी सभा

भुजबळ जामिनावर सुटले, पुढे काय ?

अटक ते जामीन, भुजबळांच्या तुरुंगवारीचा प्रवास

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 6, 2018 05:02 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close