Home /News /mumbai /

Maratha Reservation: आरक्षणासाठी संभाजीराजेंचा एल्गार, 25 ऑक्टोबरपासून पुन्हा राज्यभर दौरा

Maratha Reservation: आरक्षणासाठी संभाजीराजेंचा एल्गार, 25 ऑक्टोबरपासून पुन्हा राज्यभर दौरा

Maratha Reservation: 'चर्चेला जाण्याचा विषयच नाही, 25 ऑक्टोबरपासून पुन्हा राज्यभर दौरा' संभाजीराजेंचा एल्गार

Maratha Reservation: 'चर्चेला जाण्याचा विषयच नाही, 25 ऑक्टोबरपासून पुन्हा राज्यभर दौरा' संभाजीराजेंचा एल्गार

Sambhajiraje on Maratha Reservation: खासदार संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा आक्रमक होत राज्यभर दौरा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

    मुंबई, 13 ऑक्टोबर : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरुन खासदार संभाजीराजे (MP Sambhajiraje) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने दिलेली आश्वासने पाळली गेली नाहीत. त्यामुळे आता चर्चेचा प्रश्नच उद्भवत नाही असं म्हणत खासदार संभाजीराजे यांनी पुन्हा एकदा राज्यभर दौरा काढण्याचं जाहीर केलं आहे. (Chhatrapati Sambhajiraje Maharashtra tour) खासदार संभाजीराजे म्हणाले, मला सरकारला पुन्हा एकदा सांगायचं आहे. मी पुन्हा मराठा समाजाच्या समन्वयकांसोबत पुन्हा एकदा राज्याचा दौरा करत आहे. 25 ऑक्टोबर नंतर हा दौरा सुरू होईल. दौऱ्याची सुरुवात रायगड पासून सोलापूर, उस्मानाबाद, अहमदगनरचा दौरा आधी करणार आहोत. संभाजीराजेंनी पुढे म्हटलं, आम्ही गेल्या काही महिन्यांपासून शांत बसलो आहोत. काहीही ठोस निर्णय झालेला नाहीये. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहिलं त्यानंतर मी नांदेड येथील दौऱ्यानंतर पुन्हा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. त्यावर सुद्धा काहीही भाष्य नाही. कुठलीही चर्चा नाही. केवळ कोविडचं कारण सांगत पुढे ढकलायचं त्यामुळेच पुन्हा आमचा महाराष्ट्र दौरा सुरू होत आहे. वाचा : महात्मा गांधींच्या सूचनेनुसार स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केली होती दया याचिका : राजनाथ सिंह संभाजीराजेंनी राष्ट्रपतींचीही घेतली होती भेट गेल्या महिन्याच्या सुरुवातीला संभाजीराजेंनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली होती. ही भेट झाल्यावर संभाजीराजेंनी म्हटलं, मराठा आरक्षणाचा प्रश्न राष्ट्रपतींपुढे मांडून मराठा समाजाला असलेली आरक्षणाची गरज व समाजाच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवन येथे भेट घेतली. गेल्या अनेक दशकांच्या आर्थिक दारिद्रयामुळे मराठा समाज हा सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मागासलेला आहे. त्यामुळे मराठा समाजास मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या समाजास आरक्षण मिळणे अत्यंत गरजेचे आहे, हि समाजाची वास्तविकता राष्ट्रपती महोदयांपुढे मांडून या विषयात लक्ष घालावे, अशी विनंती केली. 105 व्या घटनादुरूस्ती नंतर राज्य मागासवर्ग आयोग गठीत करून त्यामार्फत मराठा समाजाच्या सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणाचा अहवाल तयार करून मराठा समाजास आरक्षण देण्याची जबाबदारी हि राज्य शासनाची आहे. यासाठी 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडून टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्य शासनाने असामान्य परिस्थिती सिद्ध करणे गरजेचे आहे. तसेच इंद्रा साहनी खटल्यात सांगितले प्रमाणे 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडून आरक्षण देण्यासाठी विशेष अपवादात्मक परिस्थिती म्हणजेच अतिदुरवर आणि अतिदुर्गम परिस्थिती सिद्ध करण्यासाठीचे निकष केंद्र सरकार मार्फत अद्ययावत करण्याची आवश्यकता यावेळी राष्ट्रपती महोदयांकडे व्यक्त केली. तसे शक्य होणार नसेल तर साधा व सोपा मार्ग म्हणजे EWS प्रमाणे 50 टक्क्यांची मर्यादा उठविण्यासाठी प्रयत्न करावेत यामुळे देशातील अनेक राज्यांतील आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी मदत होईल, अशी भूमिका मांडली.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Maharashtra, Maratha reservation, Sambhajiraje chhatrapati

    पुढील बातम्या