मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /संभाजीराजेंचं आंदोलन भाजप प्रणित, अशोक चव्हाणांचं टीकास्त्र

संभाजीराजेंचं आंदोलन भाजप प्रणित, अशोक चव्हाणांचं टीकास्त्र


'भाजपचे खासदार संसदेत एक शब्द मराठा आरक्षणाबाबत बोलले नाही, त्याबाबत बदनामी झाली'

'भाजपचे खासदार संसदेत एक शब्द मराठा आरक्षणाबाबत बोलले नाही, त्याबाबत बदनामी झाली'

'भाजपचे खासदार संसदेत एक शब्द मराठा आरक्षणाबाबत बोलले नाही, त्याबाबत बदनामी झाली'

मुंबई, 20 ऑगस्ट : मराठा आरक्षणाच्या (maratha reservation) मुद्यावरून खासदार संभाजीराजे (sambhaji raje) यांनी आज सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नांदेडमध्ये आंदोलन करण्यात आलं. परंतु, संसदेत भाजप उघड्यावर पडलं त्यामुळे हे भाजपकडून डॅमेज कंट्रोल सुरू आहे, अशी टीका अशोक चव्हाण (ashok chavan) यांनी केली.

अशोक चव्हाण यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आजच्या आंदोलनावरून संभाजीराजेंवर निशाणा साधला.

'खासदार संभाजीराजे यांनी आंदोलन केलं. पण, खासदार संभाजीराजे यांच्याबद्दल आदर आहे. त्यांच्यावर व्यक्तिगत टीका करणार नाही. पण, आजच आंदोलन हे भाजप प्रणित आहे, ते संभाजीराजे यांना आंदोलनकर्त्यांनी सांगितलं नाही.  संभाजी राजे यांनी आंदोलन कोण करतंय याची माहिती घ्यावी' असा टोला अशोक चव्हाण यांनी लगावला.

कोहली आणि BCCI मध्ये T20 World Cup वरून खलबतं!

संभाजीराजे यांना संसदेत बोलू दिलं नाही. खासदार संभाजीराजे यांच्या नावाचा गैरवापर सुरू आहे. नांदेड मधील माझे विरोधकांनी संभाजीराजेंना आणलं. या आंदोलनापासून मराठा नेते दूरच होते, असा आरोपही चव्हाणांनी केला.

'भाजपचे खासदार संसदेत एक शब्द मराठा आरक्षणाबाबत बोलले नाही, त्याबाबत बदनामी झाली. ते भाजपला आता दुरुस्त करायचं आहे. मराठा समाजाला कुठेही कास्ट व्हॉईडिटी मागितलेली नाही, असंही अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं.

सारथी संस्थेला कोल्हापूर उपकेंद्र दिलं ते आता सुरू आहे, पुण्यात जागा दिली. महसूल मंत्री आणि आम्ही मराठा विद्यार्थी हॉस्टेलसाठी सर्व जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा झाली आहे. 14 हॉस्टेल सुरू झाल्या आहेत,

मराठा आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहे.  गुन्हे मागे घेण्याबाबत विचार करण्यात आला आहे, त्यातून 199 केस मागे घेतले आहे. 109 केस मागे घेण्याबाबत न्यायालयाला विनंती केली आहे. 16 केसेसमध्ये 5 लाखापेक्षा अधिक नुकसान झालं आहे त्यात काहीही करता येत नाही, असंही चव्हाणांनी स्पष्ट केलं.

स्वयंपाक करण्यावरून झाली भांडणं, हातोडा मारून घेतला ‘रुम पार्टनर’चा जीव

'मराठा आरक्षण मिळवे यासाठी मी भांडत राहणार, सुप्रीम कोर्टात आणि संसदेत प्रकरण असताना भाजपने आंदोलन का केलं नाही? दिल्लीत गेल्यावर सर्वपक्षीय गटनेत्यांच्या सोबत चर्चा करावी असा निर्णय झाला होता, त्यानुसार मी भेटलो. मी संभाजीराजे यांना भेटणार आहे, असंही चव्हाण म्हणाले.

यूपीएच्या नेत्या सोनिया गांधी यांनी समविचारी विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक बोलावली हे महत्वपूर्ण पाऊल आहे. यूपीए मजबूत होतंय. यूपीएमध्ये शिवसेना आली तर यूपीए अधिक मजबूत होईल, असंही चव्हाण म्हणाले.

First published:
top videos

    Tags: Ashok chavan, Maratha reservation, Nanded, Sambhajiraje chhatrapati