Home /News /mumbai /

Maratha Reservation: मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी संभाजीराजेंनी सांगितले 'हे' पर्याय

Maratha Reservation: मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी संभाजीराजेंनी सांगितले 'हे' पर्याय

Chhatrapati Sambhaji Raje on Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी खासदार संभाजीराजेंनी महाराष्ट्राचा दौरा करुन अनेक नेत्यांच्या भेटीगाठी सुद्धा घेतल्या.

मुंबई, 28 मे: मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळवून देण्यासाठी खासदार संभाजीराजे (MP Sambhaji Raje) यांनी महाराष्ट्राचा दौरा (Maharashtra tour) करत विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्यानंतर आता संभाजीराजे आपली मराठा आरक्षणाच्या संदर्भातील पुढील भूमिका स्पष्ट करत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी संभाजीराजे यांनी काही पर्याय मांडले आहेत. पत्रकार परिषदेत संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका घेत 6 जूनपर्यंतचा अल्टिमेटम सुद्दा दिला आहे. जर 6 जूनपर्यंत निर्णय झाला नाही तर किल्ले रायगडावरून आंदोलन करणार असल्याचं संभाजीराजेंनी म्हटलं आहे. 6 जून शिवराज्यभिषेकदिनी मराठा समाजाची निर्णायक भूमिका किल्ले रायगडावरून जाहीर करणार असल्याचं संभाजीराजेंनी म्हटलं आहे. म्हणून मी स्पष्टच सांगितलं आहे मुख्यमंत्र्यांना... 6 जून रोजी काय झालं शिवाजी महाराज हे छत्रपती झाले. शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक यावेळी झाला. 6 जूनपर्यंत मराठा आरक्षणाच्या संदर्भावर निर्णय घेतला नाही तर आमची आंदोलनाची भूमिका, रायगडावरून आंदोलनाची सुरूवात करणार असंही संभाजीराजेंनी म्हटलं आहे. संभाजीराजेंच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे राजीनामा देऊन प्रश्न सुटत असेल तर देतो मी बहुजन समाजाचं नेत्रृत्व करतो 70 टक्के मराठा समाजासाठी एकत्र या जर बहुजन समाजाची इच्छा असेल तर नवा पक्ष स्थापन करण्याचा विचार करू मुख्यमंत्र्यांनी तातडीने पत्र लिहून सर्व आमदार, खासदारांना चर्चेसाठी बोलवावं, मी सुद्धा येईल मी सगळ्यांना अंगावर घेतलंय, ज्यामुळं माझं सामाजिक आणि राजकीय नुकसान होणार आहे. पण मी शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्या विचारसरणीसाठी मी समोर आलोय - छत्रपती संभाजीराजेंची प्रथमच कबुली आरक्षणासाठी दोन दिवसांचं अधिवेशन घ्यावं, संभाजी राजेंची मागणी दिल्लीत एक परिषद घेणार 8 ऑगस्टला सर्वांना आमंत्रित करणार आरक्षणासाठी दिल्लीत खासदारांची परिषद घेणार सारथीचा मुद्दाही महत्त्वाचा आहे, सारथीसाठी 1000 कोटी रुपयांची तरतूद करावी ओबीसी मध्ये नवीन प्रवर्ग तयार करता येऊ शकते का हे पूर्वीच्या सरकारने मुख्यमंत्र्यांनी, शरद पवाराांनी स्पष्ट करावं तिसरा पर्याय 342 ए च्या माध्यमातून आपला प्रस्ताव केंद्राकडू मांडू शकता. या माध्यमातून आपल प्रपोजल राज्यपालांसमोर मांडावे केंद्रा पुढे मांडा गायकवाड अहवालातील तृटी दुर करा. राष्ट्रपतींकडे विषय सादर करावा आयोग स्थापन करा दुसरा पर्याय आहे क्युरेटिव्ह पीटिशन पहिला पर्याय राज्य सरकारने पुर्नविचार याचिका दाखल करायला हवी, केवळ लोकांना दाखवण्यासाठी नको तर फूल प्रुफ असावं मराठा समाजाला न्याय मिळवून द्या, आम्हाला बाकी देणंघेणं नाही - संभाजीराजे यांचा सत्ताधारी आणि विरोधकांना निर्वाणीचा इशारा वेळ पडली तर कायदा सुद्धा हातात घेतील, आज माझ्यामुळे ते शांत आहेत मराठा समाज व्यथित झाला आहे मराठा समाजातील नागरिक अस्वस्थ आहेत, दु:खी आहेत मराठा समाजाला वेठीस धरू नका मला साथ देणाऱ्या मराठा समाजाचे आभार मानतो कोरोनामुळे मवाळ भूमिका घेतली कोर्टाच्या निर्णयामुळे अस्वस्थ झालो 50 लाख लोक आझाद मैदानात आले होते आपल्या सर्वोच्च न्यायलयाने फॉरवर्ड क्लास असे म्हटल आहे न्यायमूर्ती गायकवाड समितीचा अहवाल अवैध ठरवण्यात आला मराठा समाजावर होणाऱ्या अन्याया विरोधात आमचा लढा कोणताही राजकीय अजेंडा घेऊन आलेलो नाहीये कुठल्याही राजकीय पक्षाच्या विरोधात आमची लढाई नाहीये 2007 पासून महाराष्ट्र मी पिंजून काढत आहे मराठा समाजाला न्याय मिळावा ही एक सरळ मागणी आमची आहे मी सकल मराठा समाजाच्या वतीने बोलतोय मुख्यमंत्र्यांसोबत बैठक  खासदार संभाजीराजे यांनी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आणि राज्याचे महाधिवक्ते आशुतोष कुंभकोनी देखील बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत संभाजीराजे यांनी आपली मराठा आरक्षणाच्या संदर्भात भूमिका सर्वांसमोर मांडली. ही बैठक जवळपास 45 मिनिटे सुरू होती. मुख्यमंत्री आणि अशोक चव्हाण यांच्यासोबत कायदेशीर बाबींवर चर्चा झाली. सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख एकत्र कसे येतील यावर सुद्धा चर्चा झाली. अडचणी निश्चित आहेत पण त्यामधून मार्ग काढता येईल. ज्या आशेने मी इथे आलो त्या संदर्भात गोष्टी होताना दिसत आहेत अशी प्रतिक्रिया छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर दिली.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: BJP, Maratha reservation, Sambhajiraje chhatrapati, Uddhav Thackeray (Politician)

पुढील बातम्या