Home /News /mumbai /

मोठी बातमी, संभाजीराजे पोहोचले मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, शिवसेना देणार पाठिंबा?

मोठी बातमी, संभाजीराजे पोहोचले मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, शिवसेना देणार पाठिंबा?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील अपक्ष आमदारांची वर्षा निवास्थानी बैठक बोलवली आहे.

    मुंबई, 19 मे : राज्यसभा निवडणुकीवरून (rajya sabha election 2022) राज्यात आता राजकीय आखाडा तापला आहे. शिवसेनेनं दुसरी जागा लढवणार अशी घोषणा केली आहे. आता राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांनी अपक्ष आमदारांची बैठक बोलावली आहे. संभाजीराजे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहोचले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील अपक्ष आमदारांची संध्याकाळी 5 वाजता वर्षा निवास्थानी बैठक बोलवली आहे. या बैठकीसाठी छत्रपतीसंभाजीराजे वर्षा बंगल्यावर आले आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संभाजीराजे यांच्यामध्ये 35 मिनिटं चर्चा झाली. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महत्वाची चर्चा वर्षा बंगल्यावर झाली आहे.सहाव्या जागेसाठी शिवसेना पाठिंबा देणार का हे पाहण्याचे ठरणार आहे. काय आहे संख्याबळ? सध्या महाविकास आघाडीकडे 169 आमदार आहेत. शिवसेना 55, राष्ट्रवादी 54, काँग्रेस 44, इतर पक्ष 8 आणि अपक्ष 8 असं महाविकास आघाडीकडे संख्याबळ आहे. तर भाजपकडे 113 आमदारांचं संख्याबळ आहे. भाजपचे 106 आमदार, रासप 1, जनसुराज्य 1 आणि अपक्ष 5 आमदार अशा एकूण 113 आमदार भाजपकडे आहेत. (IPL : मुंबईला पुढच्या सिझनसाठीही धक्का, विश्वास ठेवला त्यानेच पुन्हा घात केला) राज्यसभेच्या एका जागेसाठी 42 मतांची गरज असते. महाविकास आघाडीकडे 169 आमदार आणि भाजपकडे 113 आमदार आहेत. संख्याबळानुसार शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार सहज राज्यसभेवर निवडून जाऊ शकतो. तर भाजपचे दोन उमेदवार राज्यसभेवर जाऊ शकतात. तिसरी जागा भाजपनं लढवल्यास फोडाफोडी करावी लागू शकते.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या