संभाजी भिडे मातोश्रीवरून रिकाम्या हाती माघारी, उद्धव ठाकरेंशी भेट नाही

संभाजी भिडे मातोश्रीवरून रिकाम्या हाती माघारी, उद्धव ठाकरेंशी भेट नाही

उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी संभाजी भिडे हे मातोश्रीवर आले होते. 20 मिनिटं ते त्यांची वाट पाहत होते. मात्र, उद्धव ठाकरे हे मातोश्रीवर नसल्यामुळे त्यांची भेट झाली नाही.

  • Share this:

मुंबई, 07 नोव्हेंबर : राज्यात सध्या शिवसेना-भाजपमध्ये सत्ता संघर्ष सुरू आहे. या सगळ्या धामधुमीत शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे प्रमुख संभाजी भिडे हे मुंबईत मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी पोहोचले होते. मात्र उद्धव ठाकरे यांची भेट न घेताच संभाजी भिडे हे मातोश्रीवरून निघाल्याची माहिती देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संभाजी भिडे यांनी उद्धव ठाकरे यांची वाट पाहिली पण ते मातोश्रीवर न परतल्यामुळे संभाजी भिडे तिथून निघून गेले.

उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी संभाजी भिडे हे मातोश्रीवर आले होते. 20 मिनिटं ते त्यांची वाट पाहत होते. मात्र, उद्धव ठाकरे हे मातोश्रीवर नसल्यामुळे त्यांची भेट झाली नाही. उद्धव ठाकरे वेळेत न परतल्यामुळे संभाजी भिडे चर्चा न करताच निघाले. 20 मिनिटं वाट बघूनही उद्धव ठाकरेंची भेट न झाल्यामुळे संभाजी भिडे रिकाम्या हाती मातोश्रीवरून निघाले. दरम्यान, भिडे गुरूजी हे अकस्मात मातोश्रीवर आले त्यावेळेस उद्धव ठाकरे हे घरी नव्हते, त्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही, असं शिवप्रतिष्ठानकडून सांगण्यात आलं.

दरम्यान, राज्यात सत्ता संघर्षाला पेटत असताना संभाजी भिडे हे उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी का आले होते? काही राजकीय विषयावर त्यांना उद्धव ठाकरेंशी चर्चा करायची होती का? अशा चर्चांना आता उधाण आलं आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्याशी संभाजी भिडे यांना नेमकं काय बोलायचं होतं? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहे.

इतर बातम्या - खळबळजनक! विजेच्या धक्क्याने मावशी आणि भाचीचा एकमेकांच्या कुशीतच मृत्यू

खरंतर राज्यात सध्या कोणाचं सरकार स्थापन होणार हा एकमेव प्रश्न जनतेच्या मनात आहे. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. तांत्रिक बाब म्हणून देवेंद्र फडणवीस हे उद्या राजीनामा देण्याची शक्यता आहे. उद्या म्हणजेच 8 नोव्हेंबरला 13 व्या विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांचा राजीनामा अपेक्षित आहेत. उद्या रात्री 12 वाजेपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली  आहे.

8 नोव्हेंबरला 13व्या विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे आणि त्यानंतर नवीन सरकार स्थापन होतं. पण राज्यात अद्याप सत्ता स्थापन करण्यावरून वाद सुरू आहे. त्यामुळे आता राज्यपाल यावर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान, मुख्यमंत्री हे थेट राज्यपालांकडे त्यांचा राजीनामा सोपवणार आहेत. जर मुख्यमंत्र्यांनी पदाचा राजीनामा दिला तर संपूर्ण मंत्रिमंडळ हे बरखास्त होईल. त्यानंतर नवीन मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी हालचालींना वेग येईल.

इतर बातम्या- BREAKING: देवेंद्र फडणवीस उद्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची शक्यता

राज्यात सध्या सत्तेवरून कठीण पेच निर्माण झाला आहे. त्यावर राजकीय सल्ला घेण्याचं काम सुरू आहे. पण मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर मंत्रिमंडळातल्या प्रत्येक मंत्र्याला राजीनामा देण्याची गरज नसते. 8 तारीख संपेपर्यंत मुख्यमंत्री हे त्यांच्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा मानला जातो.

दरम्यान, उद्या देवेंद्र फडणवीस हे थेट राज्यपालांकडे राजीनामा देतील असं सांगण्यात आलं आहेत. त्यानंतर राज्यातील परिस्थिती हाताळण्यासाठी राज्यपाल देवेंद्र फडणवीस यांना काळजीपाहू मुख्यमंत्री म्हणून नेमू शकतात. पण यातून देवेंद्र फडणवीस कोणतेही धोरणात्मक निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यामुळे आता राज्यपाल काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

First published: November 7, 2019, 10:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading