कसे काय जमते बुवा यांना हे सगळे? सेनेचा शहा-नितीशकुमारांना टोला

कसे काय जमते बुवा यांना हे सगळे? सेनेचा शहा-नितीशकुमारांना टोला

'2014 च्या विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार हे भारतीय जनता पक्षाबरोबर नव्हते. त्यांच्या ‘जदयु’ पक्षाने लालू यादवांच्या ‘राजद’शी आघाडी करून निवडणुका लढविल्या. त्या निवडणुकीत नितीशकुमार यांचा मुख्य शत्रू भाजप होता.'

  • Share this:

मुंबई, 20 ऑक्टोबर : 'नितीशकुमार हे जुने व भरवशाचे सहकारी आहेत हे विधान तर्कसंगत नाही. नितीशकुमार ‘एनडीए’त जाऊन येऊन राहिले. तरी ते निष्ठावान, जुने सहकारी ठरतात. त्याबद्दल नितीशकुमारांच्या कौशल्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच. कसे काय जमते बुवा यांना हे सगळे? ते रहस्यच आहे. बिहारच्या निवडणुकीत नितीशकुमार हा खरोखरच विकासाचा चेहरा आहे काय? असा सवाल करत शिवसेनेनं भाजप आणि नितीशकुमारांवर निशाणा साधला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून बिहार निवडणुकीच्या निमित्ताने मुझफ्फरपूर स्ट्रीट लाइट योजनेचा पर्दाफाश करण्यात आला आहे.

जगातील सर्वात खराब आवाज कोणता? तज्ज्ञांनी शोधला, पाहा तुम्हालाही पटतंय का?

'बिहारच्या निवडणुकीत नितीशकुमार हा खरोखरच विकासाचा चेहरा आहे काय? याचे उत्तर त्यांच्याच मंत्रिमंडळातील नगरविकास आणि गृहनिर्माणमंत्री सुरेश कुमार शर्मा यांनी दिले आहे. त्यांनी गडबड अशी केली आहे की, एक झगमगाट करणाऱ्या ‘स्ट्रीट लाइट’ने उजळून निघालेल्या फ्लायओव्हरचा फोटो स्वतःच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आणि त्याला शीर्षक दिले, ‘मुझफ्फरपूर स्ट्रीट लाइट योजना.’ आता जागरुक मतदारही कामास लागले व हा भव्य सुंदर प्रकाशमान रस्ता शोधू लागले. तेव्हा संपूर्ण मुझफ्फरपूर पालथे घातले तरीही मंत्र्यांनी ‘टाकलेला’ या फोटोतील रस्ता मिळाला नाही. कारण नितीशकुमारांच्या मंत्र्यांनी ‘स्वतःचे कार्य’ म्हणून टाकलेला हा फोटो प्रत्यक्षात हैदराबादमधील रस्त्याचा होता', असा म्हणत सेनेनं थेट नितीशकुमारांवर निशाणा साधला आहे.

'भाजपला बिहारात सर्वाधिक जागा मिळाल्या तरी नितीशकुमार हेच मुख्यमंत्री राहतील.  शहा यांचे हे विधान महत्त्वाचे आहे. शहा म्हणतात, नितीशकुमार हे आमचे जुने सहकारी आहेत. त्यामुळे आघाडी मोडण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. इथे एक दुरुस्ती करणे गरजेचे आहे. नितीशकुमार हे जुने व भरवशाचे सहकारी आहेत हे विधान तर्कसंगत नाही. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार हे भारतीय जनता पक्षाबरोबर नव्हते. त्यांच्या ‘जदयु’ पक्षाने लालू यादवांच्या ‘राजद’शी आघाडी करून निवडणुका लढविल्या. त्या निवडणुकीत नितीशकुमार यांचा मुख्य शत्रू भाजप होता.

PPE सूट घालून 'घुंघरू'वर धरला ताल; डॉक्टरच्या भन्नाट डान्सचा VIDEO एकदा पाहाच

भाजपनेही नितीशकुमारांवर हल्ले करण्याची मालिकाच चालवली होती. 2014 सालात व 2020 च्या निवडणुकीत साम्यस्थळ एकच, ते म्हणजे तेव्हाही आपल्या जागा जास्त आल्या तरी मुख्यमंत्री नितीशबाबूच होतील, अशी घोषणा लालू यादव यांनी केली होती. त्याप्रमाणे ‘जदयु’च्या जागा लालू यांच्या पक्षापेक्षा कमी येऊनही मुख्यमंत्रिपदी नितीशकुमार विराजमान झाले. पण मध्येच लालू यादवांशी काडीमोड घेऊन ते भाजपशी सत्तासंग करून बसले. आताही अमित शहा यांना जाहीर करावे लागले की, आम्ही जास्त जागा जिंकल्या तरी मुख्यमंत्री नितीशबाबूच. . बिहारच्या निवडणुकीत नितीशकुमार हा खरोखरच विकासाचा चेहरा आहे काय?' असा सवाल करत सेनेनं भाजपला विचारला आहे.

कोरोना परिस्थितीचा आता असाही परिणाम; तु्म्हालादेखील अशी स्वप्नं पडतायेत का?

'बिहारच्या विकासाचा खरा चेहरा हा असा आहे! सुशांतसिंह राजपूतच्या नावावर मते मागणे सुरूच आहे व आता हे इतर राज्यांतील विकास कामे स्वतःच्या नावावर खपविण्याचे भुरटे-भामटे उद्योगही नव्या दमाने सुरूच आहेत. बिहारमध्ये कुपोषण, भूक, रोजगाराचा प्रश्न आगडोंबासारखा उसळला आहे. आमचे बिहारी मजूर इतर राज्यांत जातात म्हणून त्या त्या राज्यांचा विकास होतो वगैरे बोलणे ठीक आहे हो, पण हे मजूर बिहार सोडून परराज्यांत जातात ते पोटाची आग विझवण्यासाठी. जे मजूर इतर राज्यांत जाऊन विकास शिल्प घडवतात त्याच श्रमणाऱ्या हातांच्या ताकदीवर नवा बिहार, विकासाच्या मार्गावरील बिहार का घडवता आला नाही? असा सवालही सेनेनं उपस्थितीत केला.

Published by: sachin Salve
First published: October 20, 2020, 8:11 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading