Home /News /mumbai /

'भुंकणाऱ्या कुत्र्यांची तोंड बंद करा', अबू आझमींची राज ठाकरेंवर टोकाची टीका

'भुंकणाऱ्या कुत्र्यांची तोंड बंद करा', अबू आझमींची राज ठाकरेंवर टोकाची टीका

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपल्या औरंगाबाद येथील भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर हल्लाबोल केला होता. याच टीकेचा धागा पकडत अबू आझमी (Abu Azmi) यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.

मुंबई, 2 मे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी त्यांच्या औरंगाबाद (Aurangabad) येथील सभेत मशिदींवरील भोंग्यांच्या (Mosque Loudspeaker) मुद्द्यावर आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी 4 तारखेपासून मशिदींवरील भोंगे उतरले नाहीत तर मशिदींसमोर भोंगे लावून दुप्पट आवाजात हनुमान चालीसाचं (Hanuman Chalisa) पठण केलं जाईल, असा इशारा दिला आहे. त्यांच्या या आव्हानावर समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी (Abu Azmi) यांनी सडकून टीका केली. राज ठाकरे यांनी आपल्या औरंगाबाद येथील भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर (NCP Sharad Pawar) हल्लाबोल केला होता. याच टीकेचा धागा पकडत अबू आझमी यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. त्यांनी राज्य सरकारने राज ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याती विनंती केली. अबू आझमी नेमकं काय म्हणाले? "शरद पवार यांच्या पायाखालच्या वाळूइतकी पण राज ठाकरेंची लायकी नाही. शरद पवार हे फक्त महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देशाचे एक ज्येष्ठ नेता आहेत. ते बडे नेते आहे. त्यांना मी सांगेन की, अशा भुंकणाऱ्यांचे तोंड बंद करा. हे संविधानच्या विरोधात बोलतात. मशिदींवरील भोंग्यांना संविधानाने परवानगी दिली आहे, सु्प्रीम कोर्टाने मशिदींवर लाऊड स्पिकर लावण्यासाठी परवानगी दिली आहे तर हे आहेत तरी कोण अशाप्रकारची भाषा करणारे?", असा सवाल अबू आझमींनी केला. "ज्या मशिदींमध्ये लाऊड स्पिकरच्या आवाजांची मर्यादा जास्त आहे तिथे सरकारने कारवाई करावी. त्यांना सरकारने समजवावं. पण फक्त मशिदींवरच का? कारण लाऊड स्पिकर फक्त मशिदींवर नाही वाजत. लाऊड स्पिकर 50 ठिकाणी वाजतात. त्यामुळे प्रचंड ध्वनी प्रदुषण होतं. पण राजकारणात ज्या लोकांना जनतेने नाकारलं आहे, ते लोक आपल्या राजकीय जागेसाठी प्रयत्न करत आहेत. कोणत्याही प्रकारे आपलं राजकारणात पुन्हा स्थान प्रस्थापित व्हावं, असा त्यांचा प्रयत्न आहे ते लोकं मशिदींच्या भोंग्यावर बोलत आहेत", असं आझमी म्हणाले. (राज ठाकरेंच्या सभेनंतर गृहखातं Action Mode मध्ये, कारवाईबाबत गृहमंत्री म्हणतात...) "जेव्हा राज ठाकरेंनी पक्ष स्थापन केला होता तेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेच्या परिवाराची व्यक्ती समजून सुरुवातीला 14 ते 15 जागा दिल्या होत्या. पण या लोकांनी द्वेषाचं राजकारण केलं. त्यामुळे जनतेनं त्यांना नाकारलं", अशी टीका आझमींनी केली. "राज ठाकरे नाटक करतात. ते कधी भाजपवर सडकून टीका करतात तर कधी भाजपसोबत चालले जातात. ते कधी झेंड्याला हिरवा रंग लावतात तर कधी झेंड्यावरुन तो रंग काढून घेतात. अशा लोकांना जास्त महत्त्व देण्याची गरज नाही. सरकारने अशा लोकांवर कठोर कारवाई करायला हवी", अशी मागणी अबू आझमींनी केली. "राज ठाकरेंना सरकारला धमकी देण्याचा अधिकार नाही. त्यांना काही सांगायचं आहे तर त्यांनी समोरुन सरकारकडे जावं आणि आपलं मत मांडावं. सरकार त्यानंतर काय करायचं ते सरकार बघेल. पण अशाप्रकारे अल्टिमेटम देवून किंवा दादागिरी देवून दुसरा समाज काही हातात बांगड्या घालून बसलेला नाही. ते अशाप्रकारे अल्टिमेटम देत असलीत तर ईट का जवाब पत्थर से असं प्रत्युत्तर देण्याती ताकद देखील आहे. पण सरकारने यात आता हस्तक्षेप करायला हवं", असं आझमी म्हणाले. "सरकारने राज ठाकरेंवर कारवाई केली नाही आणि मशिदींसमोर दुप्पट आवाजात लाऊड स्पिकर लावला तर सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. मंदिरात तुम्ही हनुमान चालीसा पठण करा. आम्ही त्याचा सन्मान करा. आमच्या सन्मानला तुम्ही कमजोरी समजू नका. याद राखा आम्ही चुपचाप बसणार नाहीत. या देशात हिंदू-मुस्लिम एकता राहिला पाहिजे. आग लागणार तर हिंदूंसोबत मुस्लिमांचीदेखील घरं जळतील. हे लोकं आपली स्वत:ची राजकीय पोळी भाजण्यासाठी अशाप्रकारे लोकांना भडकवत आहे. अशा लोकांना जास्त महत्त्व देऊ नका. सुप्रीम कोर्टाने कायदा बनवलेला नाही तर हे होतात कोण बोलणार?", असा सवाल आझमींनी केला.
Published by:Chetan Patil
First published:

Tags: Abu azmi, Aurangabad, Maharashtra politics, MNS, Raj Thackeray, Samajvadi party

पुढील बातम्या