सलमान खानचा 'शेरा' शिवसेनेत, विधानसभेत महत्त्वाची भूमिका

सलमान खानचा 'शेरा' शिवसेनेत, विधानसभेत महत्त्वाची भूमिका

शिवसनेच्या प्रचारातदेखील सहभागी होणार असल्याचं सांगितलं आहे. शेरा यांनी मातोश्रीवर शिवसेनेचं सदस्यत्व स्विकारलं आहे.

  • Share this:

मुंबई, 19 ऑक्टोबर : बाँलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान याचा प्रसिद्ध बॉडिगार्ड आणि सुरक्षा संस्थेचा प्रमुख शेरा याने शुक्रवारी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेदेखील उपस्थित होते. यावेळी त्याने शिवसनेच्या प्रचारातदेखील सहभागी होणार असल्याचं सांगितलं आहे. शेरा यांनी मातोश्रीवर शिवसेनेचं सदस्यत्व स्विकारलं आहे.

शिवसेनेच्या ट्विटर हँडलवरून याबद्दल घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रात लवकरच निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. यात शेरा शिवसेनेच्या वतीने महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. गेल्या 20 वर्षांपासून शेरा सलमान खानचा बॉडिगार्ड आहे. सलमानसुद्धा त्याला आपल्या कुटूंबापेक्षा कमी मानत नाही. शेराचं खरं नाव गुरमीतसिंग जॉली आहे.

शेराबद्दल तुम्हाला हे माहित आहे का?

सुरक्षा देण्याच्या बदल्यात शेरा वर्षाचे सुमारे 2 कोटी रुपये घेतो, म्हणजेच त्यांना फी म्हणून सुमारे 16 लाख महिन्याला मिळतात. शीख कुटुंबातील असलेल्या शेराला लहानपणापासूनच बॉडी बिल्डिंगची आवड होती. म्हणूनच 1987 मध्ये तो ज्युनियर मिस्टर मुंबई आणि 1988ला जूनियर वर्गात मिस्टर महाराष्ट्र म्हणून निवडला गेला.

इतर बातम्या - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: नेत्याने सभा झाल्यानंतर केला डान्स; व्हिडीओ Viral

शेराचे वडिल मुंबईत गाड्या दुरुस्तीचं वर्कशॉप चालवत होते. त्याचे वडील त्याला शेरा म्हणायचे. सुरुवातीला काही कलाकारांसमवेत भारतात हॉलिवूड चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान शेरा सलमानचा अंगरक्षक बनला होता. 1995 मध्ये, सोहेल खानने शेराची सलमानच्या परदेश दौर्‍यासाठी मदत मागितली. नंतर सोहेलने शेराला विचारले- 'तू नेहमी तुझ्या भावाबरोबर राहाशील का?'

इतर बातम्या - BREAKING : अज्ञात वस्तूच्या स्फोटामुळे कोल्हापुरात खळबळ, एकाचा मृत्यू

एकदा सोहेलने शेराला ऑफिसमध्ये बोलावलं होतं. कारण, सलमान खानला बाहेरील शोसाठी सुरक्षा हवी होती. जेव्हा तो सोहेल खानला भेटला, तेव्हा त्याने शेराला सांगितले की, 'तुम्ही शोच्या सुरक्षेसाठी सलमान भाईबरोबर बाहेर जाल.' त्यानंतर शेराने सलमानच्या सुरक्षेसाठी होकार दिला. शेराच्या सेवेत खूश होऊन सलमानने त्याला कायमचा आपला अंगरक्षक बनवला. त्यानंतर तो खान कुटुंबातील सदस्य झाला आहे.

बॉलिवूडमध्ये सलमान आपल्या मैत्रीसाठी ओळखला जातो. शेराच्या म्हणण्यानुसार, तो सलमानला मित्राप्रमाणे संरक्षण देतो. शेरा मुंबईत सलमानच्या शेजारी राहत होता. सलमानच्या आदेशानुसार, शेराने स्वत:ची इव्हेंट कंपनी 'विजक्रॉफ्ट'ही उघडली आहे. 'टायगर सिक्युरिटी' ही आणखी एक कंपनी आहे जी सेलिब्रिटींना संरक्षण पुरवते.

इतर बातम्या - आज प्रचाराचा शेवटचा दिवस गाजणार, मुख्यमंत्री ते राज ठाकरे अशा आहेत सभा!

Published by: Renuka Dhaybar
First published: October 19, 2019, 9:56 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading