मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /'वेतन खात्यात जमा केले, कामावर रुजू व्हा' अनिल परबांचं ST कर्मचाऱ्यांना आवाहन!

'वेतन खात्यात जमा केले, कामावर रुजू व्हा' अनिल परबांचं ST कर्मचाऱ्यांना आवाहन!

'एसटी ही सर्वसामान्य माणसांची जीवनवाहीनी आहे. दिवाळीच्या तोंडावर प्रवाशी जनतेची गर्दी वाढणार आहे. त्यामुळे..'

'एसटी ही सर्वसामान्य माणसांची जीवनवाहीनी आहे. दिवाळीच्या तोंडावर प्रवाशी जनतेची गर्दी वाढणार आहे. त्यामुळे..'

'एसटी ही सर्वसामान्य माणसांची जीवनवाहीनी आहे. दिवाळीच्या तोंडावर प्रवाशी जनतेची गर्दी वाढणार आहे. त्यामुळे..'

मुंबई, 01 नोव्हेंबर : ऐन दिवाळी (diwali) सणाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी ( st bus employees) आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (anil parab) यांनी अखेरीस एसटी कर्मचाऱ्यांची मागणी मान्य केली आहे. 'ऑक्टोबर महिन्याचे वेतन आजच खात्यात जमा केले असून जनतेची एसटीशी असलेली नाळ तुटू देऊ नका'  असं आवाहन परब यांनी केले आहे.

अनिल परब यांनी एक पत्रक प्रसिद्ध करून एसटी कर्मचाऱ्यांना भावनिक साध घातली आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर महिन्याचे वेतन नोव्हेंबर महिन्याच्या 1 तारखेला म्हणजेच दिवाळीपूर्वी देण्याची जाहीर केले होते. त्यानुसार सुधारीत महागाई व घरभाडे भत्त्यासह ऑक्टोबर २०२१ चे वेतन त्याचबरोबर दरवर्षी दिली जाणारी दिवाळी भेट आज सर्व कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे, अशी माहिती परब यांनी दिली.

DRDO Recruitment: DRDO मध्ये इंजिनिअर्सच्या तब्बल 116 जागांसाठी मोठी पदभरती

तसंच, एसटी कर्मचाऱ्यांच्या ज्या काही राहिलेल्या मागण्यांसंदर्भात  एसटी महामंडळ सकारात्मक आहे. यावर  दिवाळीनंतर चर्चा करण्यात येणार आहे. एसटी ही सर्वसामान्य माणसांची जीवनवाहीनी आहे. दिवाळीच्या तोंडावर प्रवाशी जनतेची गर्दी वाढणार आहे. त्यामुळे त्यांच्या प्रवासाची गैरसोय टाळण्यासाठी तसेच जनतेची एसटीवरील विश्वासर्हता जपण्यासाठी अघोषित संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर तातडीने रुजू व्हावे' असं आवाहन केलं आहे.

T20 World Cup : शारजाहमध्ये सचिननंतर बटलरचं वादळ, वर्ल्ड कपमधलं पहिलं शतक!

'गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे एसटी महामंडळ प्रचंड आर्थिक अडचणीत असताना देखील आतापर्यंत सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यात आले आहे. सध्या 85 टक्के आगारातील वाहतूक सुरुळीत सुरू असून उर्वरीत 15 टक्के आगारातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. ही विस्कळीत वाहतूक पूर्ववत करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे, संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांनी तातडीने आपापल्या कामावर रूजू व्हावे व दिवाळी सणादरम्यान सर्वसामान्य जनतेची गैरसोय टाळावी, असंही परब यांनी यावेळी सांगितलं.

First published:

Tags: Anil parab