अशी कोसळली साई सिद्धी इमारत, पाहा सीसीटीव्ही फुटेज

25 जुलैला सकाळी 10 वाजून 23 मिनिटांनी ही इमारत कोसळायला सुरुवात झाली. इमारत कोसळण्याआधी बाहेर उभे असलेल्या लोकांना इमारत कोसळण्याची चाहूल लागली आणि ते या इमारतीमधील रहिवाश्यांना ओरडून बाहेर निघा असं सांगताना दिसताहेत.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Aug 11, 2017 12:35 PM IST

अशी कोसळली साई सिद्धी इमारत, पाहा सीसीटीव्ही फुटेज

मुंबई, 11 आॅगस्ट : 25 जुलै 2017ला घाटकोपर पश्चिमेला असलेली साई सिद्धी 4 मजली इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला. ही इमारत कशी कोसळली याचं सीसीटीव्ही फुटेज आयबीएन लोकमतला मिळालं आहे. 25 जुलैला सकाळी 10 वाजून 23 मिनिटांनी ही इमारत कोसळायला सुरुवात झाली. इमारत कोसळण्याआधी  बाहेर उभे असलेल्या लोकांना इमारत कोसळण्याची चाहूल लागली आणि ते या इमारतीमधील रहिवाश्यांना ओरडून बाहेर निघा असं सांगताना दिसताहेत. काही सेकंदातच ही मारत कोसळून धुराळा उडताना दिसत आहे तर रस्त्यावरून जाताना युवक आणि एक महिला त्यापूर्वी धावताना या सीसीटीव्हीत कैद झाले आहे.

या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला. याला जबाबदार होता तो शिवसेनेचा पदाधिकारी सुनील सितप. त्याने तळ मजल्यावर असलेल्या रुग्णालयात विनापरवानगीने नूतनीकरण सुरू केलं होतं. यामुळे ही इमारत पडल्याचा आरोप इथे राहत असलेल्या रहिवाश्यांनी केला आहे. सुनील सितपला आणि अनिल मंडल यांना पोलिसांनी अटक तर केली पण ही इमारत कोसळण्याच्या पाच मिनिटांपूर्वी सुनील सितप या इमारतीतून बाहेर पडताना सुद्धा या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे.

सुनील सितप हा बाहेर उभ्या असलेल्या आपल्या आलिशान कारमध्ये बसून जाताना दिसत आहे. या दुर्घटनेचा पोलीस अजूनही तपास करत असून यात आतापर्यंत फक्त दोघांनाच अटक करण्यात आली. सुनील सितपइतकेच पालिका अधिकारीही या दुर्घटनेला जबाबदार आहेत. त्यांना पोलिसांनी अजूनही हात लावला नाही. पालिका अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय सुनील सितप हा या रुग्णालयाच्या नूतनीकरणाचं काम करणे शक्य नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 11, 2017 12:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close