बिल्डर समीर भोजवानी धमक्या देतायत, सायराबानोंनी केली तक्रार

बिल्डर समीर भोजवानी धमक्या देतायत, सायराबानोंनी केली तक्रार

सायरा बानो यांच्या तक्रारीनुसार समीर भोजवानी गेली अनेक वर्ष दिलीप कुमार यांना धमक्या देतोय. वांद्र्यांच्या पालीहिल भागातील बंगला बळकावण्याचा तो प्रयत्न करतोय.

  • Share this:

13 डिसेंबर : अभिनेत्री सायराबानो यांनी आर्थिक गुन्हे शाखेत  बिल्डर समीर भोजवानी यांच्याविरोधात तक्रार केलीय. सायरा बानो यांच्या तक्रारीनुसार समीर भोजवानी गेली अनेक वर्ष दिलीप कुमार यांना धमक्या देतोय. वांद्र्यांच्या पालीहिल भागातील बंगला बळकावण्याचा तो  प्रयत्न करतोय.

बिल्डर भोजवानीनं 150 कोटींची जमीन 999 वर्षांसाठी दिलीप कुमार यांना भाडेतत्त्वावर दिली. त्यावर त्यांनी दोन मजली बंगला बांधला. 1953पासून ते तिथे राहतायत.

मध्यंतरी त्या बंगल्याच्या पुनर्विकासाला भोजवानींनी आक्षेप घेतला होता. तेव्हापासून कोर्टात खटला सुरू आहे.

First published: December 13, 2017, 7:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading