शिर्डी वादावर पडदा.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मध्यस्थी यशस्वी

शिर्डी वादावर पडदा.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मध्यस्थी यशस्वी

शिर्डी ग्रामस्थांची भूमिका मांडताना साईभक्तांच्या भावना लक्षात घेऊन बंद पाळला.

  • Share this:

मुंबई,20 जानेवारी: शिर्डी येथील ग्रामस्थांनी बंद पुकारल्याच्या पार्श्वमीवर सोमवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मध्यस्थी यशस्वी झाली. शिर्डीच्या ग्रामस्थांनी पाथरीच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास हरकत नसल्याचे या बैठकीत जाहीर केले. पाथरी येथील तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे. जन्मस्थळाचा वाद कशासाठी, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

पाथरीला साई जन्मस्थानाचा दर्जा मिळाल्याने संतप्त झालेल्या शिर्डीकरांनी आपला बंद मागे घेतला. शिर्डी शिस्तमंडल ने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. आमचा वाद मिटला आहे आम्ही बंद मागे घेतोय ही भूमिका घेतली. पण पथरीला दिलेल्या जन्मस्थानाचा मुद्दा निकाली निघाला का? यावर मात्र शिर्डीकरांनी भाष्य केले नाही.

दरम्यान, सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार राधाकृष्ण विखे-पाटील, शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर आदींसह शिर्डी ग्रामस्थ उपस्थित होते.

शिर्डी ग्रामस्थांची भूमिका मांडताना साईभक्तांच्या भावना लक्षात घेऊन बंद पाळला. यापूर्वी जन्मस्थळाबाबत शासनाची कुठलीच भूमिका नव्हती, अशीच भूमिका आता असावी असा मुद्दा आमदार श्री. विखे- पाटील यांनी यावेळी मांडला. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ग्रामस्थांनी श्रद्धा आणि सबुरी ठेवावी. औरंगाबाद येथे झालेल्या विभागीय बैठकीत आपण पाथरीच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे. त्यामुळे या भागाचा देखील विकास व्हावा.

मुख्यमंत्र्यांच्या या यशस्वी मध्यस्थीनंतर पाथरीच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला आमची हरकत नसल्याचे शिर्डीच्या ग्रामस्थांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसुल मंत्री यांचा शिर्डी संस्थान व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 20, 2020 07:36 PM IST

ताज्या बातम्या