Home /News /mumbai /

आधी एकनाथ शिंदेंविरोधातच शिवसेना भवनासमोर आंदोलन; मग गुवाहाटीत कसे पोहोचले सदा सरवणकर?

आधी एकनाथ शिंदेंविरोधातच शिवसेना भवनासमोर आंदोलन; मग गुवाहाटीत कसे पोहोचले सदा सरवणकर?

दोन दिवसांपूर्वी दादर माहिमचे विधानसभेचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी शिवसेना भवनासमोर आंदोलन केलं होतं. मात्र आता तेच आता गुवाहाटीत दाखल झाले आहेत.

मुंबई 23 जून : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केलं आहे. यामध्ये शिवसेनेचे 40 पेक्षा अधिक आमदार गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आमदार गेल्यामुळे शिवसेनेत उभी फुट पडली आहे. या बंडानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. अनेक ठिकाणी शक्ती प्रदर्शन करण्यात आली आहेत. यामध्ये दोन दिवसांपूर्वी दादर माहिमचे विधानसभेचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी शिवसेना भवनासमोर आंदोलन केलं होतं. मात्र आता तेच आता गुवाहाटीत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री मंत्रालयाला देणार निरोप? दुपारी सर्व सचिवांसोबत उद्धव ठाकरेंची बैठक या आंदोलनात सदा सरवणकर यांची मुलगी सुद्धा उपस्थित होती. मात्र आता एकनाथ शिंदेंचा विरोध करणारे आमदारच थेट गुवाहाटीत दाखल झाल्याने दादर माहीममधील शिवसैनिकांना धक्का बसला आहे. सदा सरवणकर यांच्याबरोबर त्यांची मुलगी आणि शाखा प्रमुख संतोष तेलवणे गुवाहाटीत दाखल झाले आहेत. जर जायचंच होतं तर इतकी नाटकं का केलीत अशी कुजबूज सध्या दादर माहीम परिसरात सुरू आहे. सदा सरवणकर यांचे सुपुत्र नगरसेवकही होते. सदा सरवणकर यांच्या भूमिकेमुळे दादर माहीममधील शिवसैनिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांच्याकडे 40 शिवसेना आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र तयार आहे. शिंदे 40 हून आमदारांचा पाठिंबा जाहीर करतील त्यानंतर भाजप राज्यपालांना पत्र लिहून सरकार स्थापनेचा दावा करेल. यानंतर सोमवारी शपथविधी होण्याची शक्यता आहे, असं या नेत्याने सांगितलं आहे. भाजप करणार सरकार स्थापनेचा दावा; सोमवारी शपथविधी होणार? वरिष्ठ नेत्यानी दिली महत्त्वाची माहिती दरम्यान बंडखोर आमदारांच्या या भूमिकेवर बोलताना संजय राऊत म्हणाले, या बंडखोर आमदारांनी परत निवडून येऊन दाखवावं. यांना मी बंडखोर नाही तर बदमाश म्हणेल, असा टोलाही राऊत यांनी लगावला. पुढे राऊत म्हणाले की जे सोडून गेले ती शिवसेना नाही, काल रात्री रस्त्यावर जे होते ती खरी शिवसेना आहे.
Published by:Kiran Pharate
First published:

Tags: Eknath Shinde, Shivsena

पुढील बातम्या