मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

सचिन वाझेनं अनिल देशमुखांचं नाव कधीच घेतलं नव्हतं, वकिलाचा खळबळजनक खुलासा

सचिन वाझेनं अनिल देशमुखांचं नाव कधीच घेतलं नव्हतं, वकिलाचा खळबळजनक खुलासा

 मुंबईतील 1750 बारची ईडीची माहिती पुर्णत: खोटी आहे, ही माहिती ईडीने पसरवली आहे

मुंबईतील 1750 बारची ईडीची माहिती पुर्णत: खोटी आहे, ही माहिती ईडीने पसरवली आहे

मुंबईतील 1750 बारची ईडीची माहिती पुर्णत: खोटी आहे, ही माहिती ईडीने पसरवली आहे

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 14 जुलै: 'अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर ईडीने (ed) केलेल्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही पण शेवटी कोर्ट काय ते  ठरवेल. मात्र, सचिन वाझेने प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. त्यात त्याने कधीच अनिल देशमुख यांच्या नावाचा उल्लेख केला नव्हता, ईडी आणि सीबीआयने (CBI) जबरदस्तीने वाझेंकडून जबाब नोंदवून घेतला, असा खळबळजनक आरोप अनिल देशमुख यांचे वकील अॅड. कमलेश घुमरे (Kamlesh Ghumre) यांनी केला आहे.

कमलेश घुमरे यांनी पत्रकार परिषद घेऊन अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांचं खंडन केलं आहे. 'मुळात सचिन वाझेला परमबीर सिंग यांनी पुन्हा पोलिस सेवेत घेतले होते. सचिन वाझे यांनी नंबर 1 साहेब म्हणून ज्यांचे नाव घेतले होते, ते अनिल देशमुख नव्हते तर ते परमबीर सिंग हेच होते, असा दावा कमलेश घुमरे यांनी केला आहे.

10 लाख मिळवण्याची संधी, जाणून घ्या LIC ची नवी पॉलिसी

तसंच, 'सचिन वाझे याने चांदिवाल आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर केलं. वाझेच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्याने कधीच अनिल देशमुख यांना पैसे दिले नाही, असं बोलतोय.  सचिन वाझेने प्रतिज्ञापत्रात म्हणटलंय की, देशमुख यांची फेब्रुवारीत कधीच भेट झाली नाही. मात्र, सीबीआय आणि ईडी यांच्या स्टेटमेंटवर संशय आहे. केंद्रीय तपास यंत्रणांना जबाब देताना वाझेवर दबाव टाकला होता', असा आरोपही घुमरे यांनी केला.

तसंच, 'चांदिवाल कमिशन समोर वाझेने दिलेले प्रतिज्ञापत्र वेगळे आहे.  पण ईडी आणि सीबीआय समोर वाझेने दिलेले जबाब दबावाखाली आहेत. मुंबईतील 1750 बारची ईडीची माहिती पुर्णत: खोटी आहे, ही माहिती ईडीने पसरवली आहे, असंही घुमरे म्हणाले.

लोकसंख्या नियंत्रण धोरणाला काँग्रेसची साथ! 'या' मंत्र्यांनी दिला पाठिंबा

'अनिल देशमुख, ऋृषिशेकेश देशमुख आणि आरती देशमुख यांना ईडीने समन्स बजावला आहे. त्यामुळे चौकशीला सामोरे न जाता सर्वोच्च न्यायालयात जाणे हा देशमुखांचा मुलभूत अधिकार आहे', असंही घुमरे यांनी सांगितलं.

IBPS Clerk Exam 2021: लिपिक पदासाठीची परीक्षा तूर्तास थांबवली; हे आहे कारण

दरम्यान, अनिल देशमुख यांच्या दोन्ही खासगी सचिवांना अटक झाल्यानंतर ईडीने आपला मोर्चा अनिल देशमुख यांच्याकडे वळवला. अनिल देशमुख यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, त्यांनी कोरोनाचा काळ आणि वय वाढल्यामुळे चौकशीला हजर राहण्यापासून मुदत मागितली होती.देशमुख यांच्या मुलालाही ईडीने चौकशीसाठी समन्स बजावला होता. त्यामुळे या प्रकरणाबाबत आता कायदेविषयक सल्ला घ्यायला देशमुख दिल्ली पोहोचले आणि त्यांनी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला.

First published: