अखेर Sachin Vaze मुंबई पोलीस दलातून निलंबित, घरावरही NIA च्या टीमने टाकला छापा

अखेर Sachin Vaze मुंबई पोलीस दलातून निलंबित, घरावरही NIA च्या टीमने टाकला छापा

सचिन वाझे ज्या मुंबई पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागाचा कार्यभार पाहत होते. तो संपूर्ण विभाग आता NIA च्या रडारवर आला आहे.

  • Share this:

मुंबई, 15 मार्च : मुंबईत गाडीत स्फोटक सापडल्या प्रकरणी मुंबई पोलीस (Mumbai Police) दलाचे अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणा अर्थात एनआयएने  (NIA) अटक केली होती. या कारवाईनंतर अखेर सचिन वाझे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

एनआयएच्या टीमने अटक केल्यानंतर सचिन वाझे यांना मुंबई सत्र न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने सचिन वाझे यांना 25 मार्चपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे. सचिन वाझे यांनी कोडडीत रवानगी झाल्यानंतर आता मुंबई पोलीस दलाकडून अखेर सचिन वाझे यांच्या निलंबनाची कारवाई केली आहे.

Mera Ration App :रेशन कार्ड धारकांच्या अडचणी संपणार, घरसबल्या मिळणार सर्व माहिती

दरम्यान, सचिन वाझे ज्या मुंबई पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागाचा कार्यभार पाहत होते. तो संपूर्ण विभाग आता NIA च्या रडारवर आला आहे.  या प्रकरणी एकूण 4 पोलिसांची NIA ने चौकशी केली आहे. पांढऱ्या इनोव्हा गाडी संदर्भात चौकशी करण्यात आली आहे. सचिन वाझेंच्या सांगण्यावरून गाडी नेली होती. यामध्ये API रियाज काझी  यांची चौकशी करण्यात आली आहे. (रियाज काझी हे सचिन वाझे यांचा राईट हॅंड मानला जातो) तसंच 2 चालकांचीही चौकशी करण्यात आली आहे.

एक वेळच्या अन्नसाठी हनी सिंग करायचा संघर्ष; या गाण्यामुळं झाला करोडपती

तसंच NIA च्या टीमने सचिन वाझे यांच्या घरी धाड टाकली आहे.  आज सकाळी NIA च्या टीमने ही कारवाई केली.  ठाण्यातील साकेत कॉम्पलेक्स येथे धाड टाकण्यात आली होती. या कारवाईमध्ये महत्वाचे पुरावे NIA च्या हाती लागल्याची सूत्रांची माहिती आहे.

नंबर प्लेट बनवून देणार ताब्यात

दरम्यान, या प्रकरणात गाड्यांना बनावट नंबर प्लेट वापरण्यात आल्या होत्या. ज्या व्यक्तीने या नंबर प्लेट तयार करून दिल्या ती व्यक्ती NIA च्या हाती लागली आहे.  ठाण्यातून या व्यक्तीला ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे. तसंच गाडीवर पोलीस लिहिणाऱ्याचा देखील जबाब नोंदवला गेला आहे.

Published by: sachin Salve
First published: March 15, 2021, 1:25 PM IST

ताज्या बातम्या