मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

'माझ्या चांगुलपणाचा फायदा घेऊ नका', चांदिवाल आयोगाने सचिन वाझेपुढे थेट हात जोडले; नेमकं काय घडलं?

'माझ्या चांगुलपणाचा फायदा घेऊ नका', चांदिवाल आयोगाने सचिन वाझेपुढे थेट हात जोडले; नेमकं काय घडलं?

अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या वकील अनिता यांनी आयोगाकडे सचिन वाझेला (Sachin Vaze) काही प्रश्न विचारण्यासाठी अनुमती मागितली. आयोगाने त्यांना अनुमती देखील दिली. पण या घडामोडी सुरु असताना आज जे काही घडलं ते देखील आता चर्चेला कारण ठरलं आहे.

अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या वकील अनिता यांनी आयोगाकडे सचिन वाझेला (Sachin Vaze) काही प्रश्न विचारण्यासाठी अनुमती मागितली. आयोगाने त्यांना अनुमती देखील दिली. पण या घडामोडी सुरु असताना आज जे काही घडलं ते देखील आता चर्चेला कारण ठरलं आहे.

अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या वकील अनिता यांनी आयोगाकडे सचिन वाझेला (Sachin Vaze) काही प्रश्न विचारण्यासाठी अनुमती मागितली. आयोगाने त्यांना अनुमती देखील दिली. पण या घडामोडी सुरु असताना आज जे काही घडलं ते देखील आता चर्चेला कारण ठरलं आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 30 नोव्हेंबर : मुंबईत चांदिवाल आयोगासमोर (Chandiwal Commission) आज माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना हजर करण्यात आलं. याशिवाय मन्सूख हिरेन हत्या (Mansukh Hiren Case) प्रकरण आणि उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरासमोर स्फोटक ठेवल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Vaze) यालादेखील आज आयोगासमोर हजर करण्यात आलं. अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या वकील अनिता यांनी आयोगाकडे सचिन वाझेला काही प्रश्न विचारण्यासाठी अनुमती मागितली. आयोगाने त्यांना अनुमती देखील दिली. पण या घडामोडी सुरु असताना आज जे काही घडलं ते देखील आता चर्चेला कारण ठरत आहे.

सचिन वाझेचा अनिल देशमुखांसोबत बातचित करण्याचा प्रयत्न

सचिन वाझे आणि अनिल देशमुख या दोघांना आज चांदिवाल आयोगासमोर हजर करण्यात आलं होतं. यावेळी आयोगासमोर वाझे आणि देशमुख यांना आजूबाजूलाच उभं करण्यात आलं होतं. अनिल देशमुख यांच्या वकील अनिता यांनी यावेळी आयोगाकडे वाझेंची उलट तपासणी करण्यासाठी परवानगी देण्याची विनंती केली. यावेळी आयोगाने वकिलांची विनंती स्वीकारली. पण यावेळी सचिन वाझे हा अनिल देशमुख यांच्यासोबत बातचित करण्याचा प्रयत्न करु लागला.

हेही वाचा : सचिन वाझे-परमबीर सिंग यांची भेट पूर्वनियोजित? दोघांची भेट घडूच कशी शकते, चौकशी होणार

...आणि आयोगाने सचिन वाझेला हात जोडले

सचिन वाझे भर आयोगासमोर अनिल देशमुख यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करु लागला. यावेळी आयोगाकडून त्याला रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच आपण असं करु नका, आयोगाने वाझेला हात जोडून सांगितले. माझ्या चांगुलपणाचा फायदा घेऊ नका, असं आयोगाकडून सचिन वाझेला रोखठोक सांगण्यात आलं. त्यानंतर सचिन वाझे गप्प बसला.

सचिन वाझे आणि अनिल देशमुख दहा मिनिटे एकाच खोलीत

या सगळ्या घडामोडींनंतर एक तासांनी चांदिवाल आयोगासमोर अनिल देशमुखांच्या वकील अनिता या सचिन वाझेची उलट तपासणी केली. त्याला वकिलांकडून जाब विचारण्यात आला. पण मधल्या एक तासांच्या दरम्यान सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांना एकाच खोलीत ठेवण्यात आलं. पण त्यानंतर दहा मिनिटांनी सचिन वाझे दुसऱ्या केबिनमध्ये येवून बसला. पण त्या दहा मिनिटात वाझेची देशमुखांसोबत बातचित झाल्याची चर्चा रंगली आहे.

हेही वाचा : ड्युटीवर नसतानाही परमबीर सिंग यांच्याकडून सरकारी गाडीचा वापर, गृहमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

अनिल देशमुखांच्या वकिलांकडून सचिन वाझेची उलट तपासणी

दरम्यान, चांदिवाल आयोगासमोर अनिल देशमुखांच्या वकील अनिता यांनी सचिन वाझेची उलट तपासणी केली. यावेळी दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याची EXCLUSIVE माहिती आमच्या हाती लागली आहे.

प्रश्न 1 : वकील अनिता : 13 मार्च 2020 तुम्हाला अटक झाली होती का?

उत्तर : सचिन वाझे : हो

प्रश्न 2 : NIA च्या कस्टडीत असताना तुमच्यावर दबाव होता का?

उत्तर : हो, ती वेळ माझ्या आयुष्यातील सर्वात जास्त कठीण वेळ होती.

प्रश्न 3 : या तणावादरम्यान तुम्ही दबावात होता का? या दरम्यान तुमची अनेक केंद्रीय यंत्रणांनी चौकशी केली का?

वाझे : मी 28 दिवस NIA कोठडीत होतो. तेव्हा ट्रॉमामध्ये होतोच पण त्या ठिकाणी माझा NIA ने छळ केला. मी आजही ट्रॉमामध्ये आहे

( वाझे पाणी प्यायला )

प्रश्न 4 : तुम्ही प्रतिज्ञापत्रात दिलेला जबाब या व्यतिरिक्त तुमच्याकडे काहीच पुरावे नाहीत का?

उत्तर : 3 मे 2021 या दिवशी मी NIA ला विनंती केली होती की मला प्रकरणासंबंधी कागदपत्रे द्यावीत ज्यात पंचनामा FIR विविध कागदपत्रे होते. पण माझ्याकडून जबरदस्तीने अनेक कागदपत्रांवर सह्या घेतल्या गेल्या.

प्रश्न 5 : त्या दरम्यान आपण तणावातून गेला होतात?

वाझे : ( उत्तर दिले नाही )

First published: