Home /News /mumbai /

Sachin Vaze, परमबीर सिंग, गृहमंत्री आणि शिवसेना प्रवेश, राज ठाकरेंचे ठाकरे सरकारला 10 सवाल

Sachin Vaze, परमबीर सिंग, गृहमंत्री आणि शिवसेना प्रवेश, राज ठाकरेंचे ठाकरे सरकारला 10 सवाल

'केंद्राने जर चौकशी केली तर फटाक्याची माळ लागेल, या प्रकरणाचा नीट तपास केला तर कल्पनेपलीकडेच चेहरे समोर येतील'

    मुंबई, 21 मार्च : मुंबई पोलीस (Mumbai Police)दलातील अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) अटक, मनसुख हिरेन (Mansukh Hire case) प्रकरण आणि माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh Letter) यांचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर गंभीर आरोप या सर्व गुंतागुंतीच्या मुद्यांवरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackery) यांनी ठाकरे सरकारला थेट सवाल विचारले आहे. तसंच, केंद्र सरकारला या प्रकरणात हस्तक्षेप करून सखोल चौकशीची मागणी केली आहे. 1- परमबीर सिंग यांना मुंबईत एक वर्ष झाले आहे. त्या हिशेबाने पाहिले तर वर्षाचे 1200 कोटी झाले असतील. गृहमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना सांगणे हे मुंबई पुरते आहे. राज्यात अनेक जिल्हे आहे तिथे सुद्धा असे प्रकार घडले असतील, त्याची चौकशी झाली पाहिजे 2- मायकल रोडवर स्फोटकांनी भरून गाडी ठेवणे हे प्रकरण गंभीर आहे. या प्रकरणी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी परमबीर सिंग यांना आयुक्तपदावरून बाजूला का करण्यात याचे उत्तर सरकारने दिले नाही. जर त्यांचा सहभाग होता तर त्यांची चौकशी का केली नाही? 3- परमबीर सिंग यांनी नुसती बदली करण्यामागे काय हेतू होता?  याचा खुलासा सरकारने केला पाहिजे 4- मायकल रोडवर जी स्फोटकं कारमध्ये सापडली होती. ती स्फोटकं आली कुठून? 5- निलंबित असलेल्या सचिन वाझे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा खास होता. सचिन वाझे यांना शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी कोण घेऊन गेलं होतं? 6-'मायकल रोडवर स्फोटकांनी भरलेली गाडी तिथे कुणी ठेवायला सांगितली,  एक पोलीस अधिकारी हे सगळं करतोय हे गंभीर आहे. हे कुणाच्या सांगण्यावरून झाले? 7- केंद्र सरकारने या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे, राज्य सरकारकडून या प्रकरणाचा तपास होणार नाही. केंद्राने जर चौकशी केली तर फटाक्याची माळ लागेल, या प्रकरणाचा नीट तपास केला तर कल्पनेपलीकडेच चेहरे समोर येतील 8- पोलीस हे परस्पर हे काम करू शकत नाही. हे कुणाच्या सांगण्यावरून काम करण्यात आले आहे. स्फोटकांनी कार सापडल्यानंतर जे धमकी पत्र दिले आहे त्यामध्ये आदराने भाषा वापरण्यात आली आहे. गुजराती व्यक्तीने हे पत्र लिहिले असावे, असा अंदाज शब्दांवरुन  येत आहे, मग ती व्यक्ती कोण? 9- 'गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना शहरातील बार-रेस्टारंटकडून पैसे वसूल करण्यास सांगणे हे अत्यंत घाणरेडे आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे. 10- केंद्र सरकारने या प्रकरणी सखोल चौकशी करून या प्रकरणाचा छडा लावला पाहिजे. या प्रकरणाचा तपास योग्य झाला नाहीतर लोकांना कायदा आणि सुव्यवस्थेवर विश्वास बसणार नाही.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: मनसे, राज ठाकरे

    पुढील बातम्या