मुंबई, 23 मार्च : मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा (Mansukh Hiren death case) महाराष्ट्र एटीएसने (ATS) छडा लावल्यानंतर नवनवीन खुलासे होत आहे. अटकेत असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) हेच मुख्य संशयित आरोपी असल्याचा दावा एटीएसचे अप्पर पोलीस महासंचाक जयजीत सिंग (Jayjit singh) यांनी केला आहे. तसंच, निलंबित कॉन्सटेबल विनायक शिंदेचा (Vinayak Shinde) हत्येत प्रत्यक्ष सहभाग आहे, असंही सिंग यांनी स्पष्ट केले.
मनसुख हिरेन प्रकरणी महाराष्ट्र एटीएसकडून पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेऊन आतापर्यंतच्या तपासाबद्दल खुलासा करण्यात आला आहे.
मनसुख हिरेन यांची पत्नी विमला हिरेन यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार, पुढील तपास करण्यात आला होता. यामध्ये सचिन वाझे यांच्यावर खुनाचा आरोप करण्यात आला आहे. पण सचिन वाझे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहे. स्कॉर्पिओ गाडी आणि मनसुख हिरेन यांच्याशी कोणतेही संबंध नसल्याचा दावा सचिन वाझेंनी केला आहे. पण त्यांच्या विरोधात पुरावे आमच्या हाती लागले आहे, असं जयजीत सिंग यांनी सांगितलं.
रश्मी शुक्ला भाजपासाठी फोन टॅप करत होत्या, नवाब मलिकांचा गंभीर आरोप
या गुन्ह्यांत वापरण्यात आलेले सिम कार्ड जप्त केले आहे. काही सिम कार्ड हे गुजरात येथून जप्त केले आहे. बनावट नावावर सिम कार्ड घेतले गेले आहे. या प्रकरणी बुकी नरेश गोरला अटक केली आहे. या हत्येत विनायक शिंदेचा सहभाग आहे. विनायक शिंदे यानेच मनसुख यांना बोलावले होते. विनायक शिंदे यांचा हत्येत प्रत्यक्ष सहभाग आहे, असंही सिंग यांनी सांगितलं.
Mansukh Hiren death case प्रकरणी 'त्या' व्होल्वो गाडीबद्दल धक्कादायक माहिती समोर
मोबाईल फोन आणि सिमकार्ड नष्ट केले आहेत. जी व्होल्वो कार जप्त केली हे. ती गाडी मनसुख यांच्या हत्येकरता वापरली होती का याची चौकशी केली जात आहे. सचिन वाझे यांचा ताबा मिळावा याकरता ट्रान्सफर ॲार्डर मिळाली आहे. पण, NIA कोर्टात वाझे यांचा ताबा घेण्यासाठी ATS जाणार आहे, असंही सिंग यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.