मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आऊट गेटने बाहेर जाताना पांढऱ्या रंगाची इनोव्हा गाडी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही गाडी सचिन वाझे यांच्या सांगण्यावरून मुंबई पोलीस आयुक्तालयात ठेवण्यात आली होती. सचिन वाझे यांचे CIU तील सहकारी ही गाडी वापरत होते. धक्कादायक म्हणजे, त्यांचे सहकारी ही गाडी नंबर प्लेट बदलून वापरत होते. शरद पवार झाले अलर्ट, राष्ट्रवादीच्या शिलेदारांची बोलावली बैठक विशेष म्हणजे, मुंबई पोलीस आयुक्तालयात माणसांनाही पूर्ण विचारपूस करुन सोडलं जातं आणि अनोळखी गाडी तर सोडली जातच नाही. शिवाय अधिकाऱ्यांच्या गाड्या या देखील सोडल्या जात नाहीत. जोपर्यंत गाड्यांचे नंबर आधीच आयुक्तालयातील गेटवर दिले गेले जात नाही तोपर्यंत कोणत्याही गाडीला सोडले जात नसते. सचिन वाझे यांच्या मागे मुंबई पोलीस आयुक्तालयातील मोठ्या अधिकाऱ्याचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. शनिवारी रात्री घेतली कार ताब्यात NIA ने ताब्यात घेतलेली पांढऱ्या रंगाची इनोव्हा कारही शनिवारी रात्री मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या (Mumbai Police Commissioner office) जवळून ताब्यात घेण्यात आली होती. ही कार गेल्या अनेक दिवसांपासून याच परिसरातच उभी होती. या कारच्या मागे मुंबई पोलीस असं लिहिलं आहे. त्यामुळे या कार मागे पोलीस कनेक्शन बोलले जात होते. आता या प्रकरणी आणखी काही पोलिसांची चौकशी होण्याची शक्यता आहे.Exclusive : पांढऱ्या रंगाची इनोव्हा ही पोलीस आयुक्तालयातच होती, @News18lokmat कडे एक्सक्लुसिव्ह व्हिडीओ pic.twitter.com/JP26EKbtTQ
— News18Lokmat (@News18lokmat) March 15, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Cctv footage, Mumbai, मुंबई पोलीस