मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /'त्या' मर्सिडीज गाडीवरून नाना पटोले आणि आशिष शेलारांमध्ये जुंपली

'त्या' मर्सिडीज गाडीवरून नाना पटोले आणि आशिष शेलारांमध्ये जुंपली

'आमचे घर काचेचे नाही, खोटे आरोप करून बदनाम करू नका, अन्यथा आम्हाला ही वेगळे मार्ग आहेत'

'आमचे घर काचेचे नाही, खोटे आरोप करून बदनाम करू नका, अन्यथा आम्हाला ही वेगळे मार्ग आहेत'

'आमचे घर काचेचे नाही, खोटे आरोप करून बदनाम करू नका, अन्यथा आम्हाला ही वेगळे मार्ग आहेत'

मुंबई, 17 मार्च : मुंबईमध्ये स्फोटकांनी सापडलेल्या गाडी प्रकरणी अटकेत असलेले एपीआय सचिन वाझे (Sachin Vaze) प्रकरणावरून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा दररोज आरोप-प्रत्यारोपांचा खेळ सुरू झाला आहे. एनआयएने (NIA) जप्त केलेल्या मसिर्डीज कारवरुन भाजपचे आमदार आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यात शाब्दिक चकमक उडाली आहे.

'केंद्रीय चौकशी यंत्रणा त्याच्या ताब्यात आहे, त्यामुळे ते काहीही आरोप करत आहे. त्यांना काय चौकशी करायची असेल तर ती करावी, असं प्रत्युत्तर पटोले यांनी दिले. तसंच, 'भाजप कार्यकर्त्याचे नाव या प्रकरणात समोर येत असल्याने शेलार यांनी खोटे आरोप केले असून यात काहीच तथ्य नाही. सुशांत सिंग प्रकरणात सुद्धा  महाराष्ट्राची बदनामी करण्याचं काम भाजपाने केलं आहे. मर्सिडीज कार जर आम्ही दुसऱ्याला घेऊन दिली असेल तर आमची चौकशी करा, नोटा मोजणारे मशीन गाडीत सापडले आहे, शेलार यांनी आम्हालाही असे मशीन आणून द्यावे, असा टोलाही पटोले यांनी लगावला.

पाहा अरुण जेठलींची ग्लॅमरस भाची; अल्ट बालाजीवर येतेय नवी वेब सीरिज

'केंद्रीय तपास यंत्रणा हा भाजपचा पोपट आहे. त्याचा कसा वापर करायचा तो करावा, त्यांना काही चौकशी करायची असेल तर करा, आमचे घर काचेचे नाही, खोटे आरोप करून बदनाम करू नका, अन्यथा आम्हाला ही वेगळे मार्ग आहेत', असा इशाराही नाना पटोले यांनी शेलारांना दिला.

IND vs ENG : चार मॅचमध्ये फक्त एक रन काढणाऱ्या राहुल बद्दल विराटचं मोठं वक्तव्य!

आज सकाळीच काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करून मर्सिडीज कार ज्या व्यक्तीची आहे, तो भाजपाच्या कार्यकर्ता असल्याचा आरोप केला आणि काही फोटो ट्विट केले होते. त्यानंतर आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत संबंधित गाडी हीच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि सचिन सावंत यांनी घेऊन दिल्याचा गंभीर आरोप केला. शेलार यांच्या या आरोपानंतर त्याला प्रत्युत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शेलार यांना चांगलेच आव्हान दिले आहे तसंच भाजपावर जोरदार सडकून टीका केली आहे.

First published:

Tags: Ashish shelar, Hiren mansukh, Nana Patole, Nia, Sachin vaze