News18 Lokmat

सचिनने का घेतली शरद पवारांची भेट? राष्ट्रवादीने दिली पहिली प्रतिक्रिया

सचिन तेंडुलकर याने काही वेळापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली.

News18 Lokmat | Updated On: Mar 30, 2019 06:26 PM IST

सचिनने का घेतली शरद पवारांची भेट? राष्ट्रवादीने दिली पहिली प्रतिक्रिया

मुंबई, 30 मार्च : भारताचा माजी क्रिकेटर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने काही वेळापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय चर्चेला उधाण आलं होतं. पण आता यावर राष्ट्रवादीने प्रतिक्रिया देत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

'सचिनने शरद पवारांची घेतलेली भेट वैयक्तिक स्वरुपाची होती. याचा राजकारणाशी संबंध नाही,' असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. सचिन-पवार भेटीचे अनेक राजकीय अर्थ काढण्यात येत होते. पण नवाब मलिक यांनी ही भेट वैयक्तिक स्वरूपाची असल्याचं सांगत सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

दरम्यान, 'पाकिस्तानसोबतच्या क्रिकेटविषयी भाष्य केल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी सचिननला देशद्रोही म्हणून ट्रोल केलं होतं. त्यावेळी शरद पवार यांनी सचिनची पाठराखण केली होती,' असंदेखील नवाब मलिक यांनी आवर्जून सांगितलं आहे.


VIDEO: ..आणि नातीने नाकारली शहा आजोबांची टोपी

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 30, 2019 06:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...