माझ्या मागणीकडे कुणी गांभीर्यानं पाहिलंच नाही, सचिननं रेल्वेमंत्र्यांना लिहिलं पत्र

मुंबईतल्या उपनगरीय रेल्वे सेवेचे २ भाग करा, ज्यामुळे निधी आणि मनुष्यबळ उपलब्ध होणं सोपं जाईल, अशी मागणी भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी डिसेंबर २०१५मध्येच केली होती. हा खुलासा खुद्द सचिन यांनी आपल्या पत्रात केला आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Oct 24, 2017 12:10 PM IST

माझ्या मागणीकडे कुणी गांभीर्यानं पाहिलंच नाही, सचिननं रेल्वेमंत्र्यांना लिहिलं पत्र

महेंद्र मोरे, मुंबई, 24 आॅक्टोबर : मुंबईतल्या उपनगरीय रेल्वे सेवेचे २ भाग करा, ज्यामुळे निधी आणि मनुष्यबळ उपलब्ध होणं सोपं जाईल, अशी मागणी भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी डिसेंबर २०१५मध्येच केली होती. हा खुलासा खुद्द सचिन यांनी आपल्या पत्रात केला आहे. रेल्वे स्थानकांवरच्या पुलांसाठी २ कोटींचा खासदार निधी देताना रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना लिहिलेल्या पत्रात सचिन यांनी त्यांच्या या मागणीची आठवण करून दिली आहे.

2015 साली सचिननं राज्यसभेत अतारांकित प्रश्न विचारला होता. पण त्या मागणीकडे दुर्लक्ष केलं गेलं, ही कमालीची गुंतागुंतीची प्रक्रिया आहे आणि त्यामुळे २ स्वतंत्र विभाग करणं शक्य नाही असं उत्तर तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी दिलं होतं. माझ्या मागणीकडे कुणी गांभीर्यानं पाहिलंच नाही, अशी खंत सचिननं पत्रात व्यक्त केलीय.

सचिन या पत्राची कालपासून जोरदार चर्चा होतेय. सचिनसारखे खासदार काही विधेयक बदल सुचवू पाहत असतील, तर त्यावर साधा विचारही न करणं योग्य आहे का, असा सवाल लोक विचारतायेत.

पाहूयात सचिननं आपल्या पत्रात नेमकं काय म्हटलंय ते..

4 डिसेंबर 2015चं पत्र

Loading...

मी रेल्वे बोर्ड, मंत्रालय आणि विभागीय प्रमुखांना अशी विनंती करतो की, उपनगरीय रेल्वेचे दोन स्वतंत्र विभाग करावेत. ही मागणी आजवर अनेकदा झालीय. अनेक तज्ज्ञांनीही ती केलीय. या मागणीला मान्य केलं तर रेल्वे समस्यांचं निराकरण करायला पुरेसा निधी आणि मनुष्यबळ उपलब्ध होईल.

राज्यसभेचा खासदार या नात्याने मी ही मागणी केली होती. पण रेल्वे मंत्रालयाच्या प्रतिसादात माझी मागणी अमलात आणणे ही कमालीची गुंतागुंतीची प्रक्रिया असल्याचं सांगण्यात आलं.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं आपल्या खासदार निधीतून मुंबई रेल्वेला 2 कोटींचा निधी देऊ केला आहे. मध्य-पश्चिम रेल्वे पादचारी पूल दुरूस्तीसाठी त्याने हा पुढाकार घेतला आहे. मुंबईतल्या मध्य रेल्वेवरील पादचारी पुल दुरुस्तीसाठी 1 कोटी आणि पश्चिम रेल्वेवरील पादचारी पुलासाठी 1 कोटी त्याने दिले आहेत. 29 सप्टेंबरला एल्फिन्स्टनच्या पादचारी पुलावर चेंगराचेंगरी झाली आणि त्यात 23 जणांचा बळी गेला होता. त्या पार्श्वभूमीवर पुलांची दुरुस्ती होणं अत्यंत गरजेचं आहे. यासाठीच सचिननं पुढाकार घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 24, 2017 09:18 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...