कोरोनामुळे सचिन तेंडुलकरने सर्वात जवळचा मित्र गमावला, भावुक होत सांगितल्या जुन्या आठवणी

कोरोनामुळे सचिन तेंडुलकरने सर्वात जवळचा मित्र गमावला, भावुक होत सांगितल्या जुन्या आठवणी

शाळेपासूनचे अनेक मित्रांना सचिन आजही तितक्याच आत्मियतेने भेटतो. म्हणूनच एका जवळच्या मित्राच्या जाण्याने सचिन हळहळल्याचं पाहायला मिळालं.

  • Share this:

मुंबई, 19 ऑक्टोबर : भारताचा दिग्गज माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचे (Sachin Tendulkar) जवळचे मित्र अवि कदम यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. याबाबत स्वत: सचिन तेंडुलकरने ट्वीट करत माहिती दिली आहे. तसंच सचिनने भावुक होत अवि कदम यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींना उजाळादेखील दिला आहे.

'माझा प्रिय मित्र अवि कदम याचं निधन झालं आहे. शाळेतल्या दिवसांपासून तो माझा जवळचा मित्र होता. क्रिकेटच्या सरावानंतर शिवाजी पार्काबाहेर आमच्यात होणारी भेट माझ्या कायम स्मरणात राहील. त्याच्या नातेवाईंसोबत माझ्या सहवेदना आहेत,' असं ट्वीट करत सचिन तेंडुलकर याने मित्राच्या आठवणी सांगितल्या आहेत.

कोरोनाची लागण झालेल्या गेल्या काही दिवसांपासून अवि कदम यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्वत: सचिनने डॉक्टरांना फोन करून त्यांच्या स्थितीबाबत माहिती घेतली होती. मात्र दुर्दैवाने अवि कदम यांचा मृत्यूसोबतचा संघर्ष अयशस्वी झाला.

सचिन तेंडुलकरने जागतिक क्रिकेटमध्ये मोठा दबदबा गाजवल्यानंतरही त्याने आपल्या जुन्या मित्रांची साथ कधी सोडली नाही. शाळेपासूनचे अनेक मित्रांना सचिन आजही तितक्याच आत्मियतेने भेटतो. म्हणूनच एका जवळच्या मित्राच्या जाण्याने सचिन हळहळल्याचं पाहायला मिळालं.

First published: October 19, 2020, 6:11 PM IST

ताज्या बातम्या