• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • काँग्रेसमध्ये दिवाळीपूर्वीच फुटले फटाके, सचिन सावंतांनी दिला प्रवक्तेपदाचा राजीनामा

काँग्रेसमध्ये दिवाळीपूर्वीच फुटले फटाके, सचिन सावंतांनी दिला प्रवक्तेपदाचा राजीनामा

आपल्याला मुख्य प्रवक्तेपदावरून डावलण्यात आल्यामुळे सचिन सावंत यांनी प्रवक्तेपदाचा राजीनामा देऊ केला आहे.

आपल्याला मुख्य प्रवक्तेपदावरून डावलण्यात आल्यामुळे सचिन सावंत यांनी प्रवक्तेपदाचा राजीनामा देऊ केला आहे.

आपल्याला मुख्य प्रवक्तेपदावरून डावलण्यात आल्यामुळे सचिन सावंत यांनी प्रवक्तेपदाचा राजीनामा देऊ केला आहे.

 • Share this:
  मुंबई, 19 ऑक्टोबर : महाविकास आघाडी सरकारला (mva government) आता दोन वर्ष पूर्ण होत आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी तिन्ही पक्ष स्थिरावले आहे. पण, काँग्रेसमध्ये (congress) अजूनही धुसफूस सुरूच आहे. काँग्रेसमध्ये प्रवक्तेपदाची निवड करण्यात आली आहे. मुख्य प्रवक्तेपदी अतुल लोंढे (atul londhe) यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे नाराज झालेले सचिन सावंत (sachin sawant) यांनी काँग्रेसच्या प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला आहे. एवढंच नाहीतर ट्वीटर अकाऊंटमधूनही त्यांनी पदाचा उल्लेख हटवला आहे. विरोधकांवर पुराव्यानिशी हल्लाबोल करणारे सचिन सावंत काँग्रेसमध्ये नाराज झाल्याचे आता समोर आलं आहे.  गेल्या १० वर्षांपासून सावंत हे काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून काम पाहत होते. वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सचिन सावंत यांनी काँग्रेस पक्षाची सडेतोड भूमिका मांडली होती. अनेक मुद्यांवरून त्यांनी भाजपला जशास तसे उत्तर सचिन सावंत यांनी दिले होते. पण, प्रवक्तेपदाच्या नुकतीच निवड प्रक्रिया पार पडली आहे. Share Market : शेअर बाजारात आज पडझड; उद्याचा दिवस कसा असेल? नवीन नियुक्तीनुसार मुख्य प्रवक्ते पदी सचिव सावंत यांच्या जागी अतुल लोंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या दहा वर्षांपासून प्रवक्ते राहिलेले सचिन सावंत नाराज झाले आहे. सावंत यांनी तडकाफडकी आपल्या प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला आहे. एवढंच नाहीतर सचिन सावंत यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटमधून प्रवक्तेपदाचा उल्लेख सुद्धा काढून टाकला आहे. सावंत यांनी आपली प्रवक्तेपदी निवड केली नसेल तर नवीन पदाची जबाबदारी देण्याची मागणी केली असल्याची माहितीही समोर आली आहे. डॉक्टर तरुणीने केली आत्महत्या; कागदावर 200 वेळा लिहिलं 'आशिष LOVE वैशाली' विशेष म्हणजे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याचा कारभार हाती घेतल्यानंतर अनेक बदल केले आहे. काही दिवसांपूर्वीच कार्यकारणी जाहीर केली आहे. या यादीत अनेक समर्थकांना बढती मिळाली आहे. प्रवक्तेपदाच्या निवडीमध्येही समर्थक असलेले अतुल लोंढे यांची निवड करण्यात आली आहे. आपल्याला मुख्य प्रवक्तेपदावरून डावलण्यात आल्यामुळे सचिन सावंत यांनी प्रवक्तेपदाचा राजीनामा देऊ केला आहे. त्यामुळे सचिन सावंत यांची पक्षाकडून कशी मनधरणी केली जाणार हे पाहण्याचं ठरणार आहे.
  Published by:sachin Salve
  First published: