S M L

महाराष्ट्रातही विकास वेडा झाला-सचिन सावंत

"मी लाभार्थी, होय हे माझं सरकार' अशा टॅगलाईन वापरून या जाहिराती सुरू आहेत. मंत्रालयाच्या तळमजल्यावर लावलेल्या अशाच एका जाहिरातीत चक्क बँकॉकमधील फोटो वापरण्यात आला आहे."

Sachin Salve | Updated On: Nov 3, 2017 08:39 PM IST

महाराष्ट्रातही विकास वेडा झाला-सचिन सावंत

03 नोव्हेंबर : राज्य सरकारच्या जाहिरातीत बँकॉकच्या रस्त्याचा फोटो दर्शवला गेला असल्याने गुजरात, मध्यप्रदेश प्रमाणे महाराष्ट्रातही विकास वेडा झाला आहे. अशी खरमरीत टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलीये.

राज्य सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सरकारकडून कोट्यवधी रूपयांच्या जाहिराती सुरू आहेत. 'मी लाभार्थी, होय हे माझं सरकार' अशा टॅगलाईन वापरून या जाहिराती सुरू आहेत. मंत्रालयाच्या तळमजल्यावर लावलेल्या अशाच एका जाहिरातीत चक्क बँकॉकमधील फोटो वापरण्यात आला आहे. राज्यातील रस्त्यांची दुरावस्था पाहता, जाहिरातीमधील रस्ता महाराष्ट्रात कुठे दिसत नाही. त्यामुळे बँकॉकच महाराष्ट्रात आले आहे, असे सांगायला हे फसवणीस सरकार कमी करणार नाही असा टोलाही सावंत यांनी लगावला.

विकासकामांना कात्री लावून न केलेल्या कामांच्या जाहिरातीवर सरकार कोट्यवधी रूपयांचा खर्च  करित आहे. त्यासाठी खासगी कंपन्यांना कोट्यवधींची कंत्राटे दिली जात आहेत. राज्य कर्जाच्या ओझ्याखाली बदलेले असताना अशा त-हेची उधळपट्टी संतापजनक आहे. सरकारची विश्वासार्हताच लयास गेली असल्यानं कितीही मार्केटींग, जाहिरातबाजी करून अतिरंजीत चित्र उभं केलं तरी जनतेचा विश्वास या टेलीब्रँड सरकारवर बसणार नाही असंही सावंत म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 3, 2017 08:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close