मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

"महाराष्ट्राला चूड लावाल तर तुमची धोतरेही पेटतील हे विसरू नका" सामनातून थेट इशारा

"महाराष्ट्राला चूड लावाल तर तुमची धोतरेही पेटतील हे विसरू नका" सामनातून थेट इशारा

"महाराष्ट्राला चूड लावाल तर तुमची धोतरेही पेटतील हे विसरू नका"

"महाराष्ट्राला चूड लावाल तर तुमची धोतरेही पेटतील हे विसरू नका"

Saamana Editorial on Bhagat Singh Koshyari over letter war: शिवसेनेने आपलं मुखपत्र असलेल्या सामनातून पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंग कोश्यारींवर टिप्पण्णी केली आहे.

  • Published by:  Sunil Desale

मुंबई, 23 सप्टेंबर : महाविकास आघाडी सरकार (MVA Government) राज्यात आल्यापासून शिवसेना (Shiv Sena) आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्यात अनेकदा संघर्ष झाले आहेत. त्यातच आता पुन्हा एकदा लेटर वॉर (Letter war) सुरू झालं आहे. महिला सुरक्षेच्या प्रश्नावर विशेष अधिवेशन बोलवण्यात यावं असं पत्र राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडे (CM Uddhav Thackeray) पाठवले आणि त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून या पत्राला खरमरीत उत्तर देण्यात आलं. मुख्यमंत्र्यांनी लिहिलेल्या या पत्रावर भाजपनेही टीका केली आहे. एकूणच यावरुन आता शिवसेनेने सामनाच्या माध्यमातून (Saamana editorial) भगतसिंग कोश्यारी यांच्यावर टिप्पणी करत इशाराच दिला आहे.

...तर तुमची धोतरेही पेटतील

सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे की, राज्यपाल हे फक्त सरकारी पैशावर पोसले जाणारे पांढरे हत्ती नाहीत. दिल्लीत सत्ता असलेल्या पक्षांची सरकारे ज्या राज्यांमध्ये नाहीत त्या राज्यांत ते मदमस्त उधळलेल्या हत्तीचाच 'रोल' अदा करतात आणि अशा हत्तींचे माहुत दिल्लीत बसून नियंत्रण करीत असतात. त्याच हत्तीच्या पायाखाली लोकशाही घटना, कायदा, राजकीय संस्कृती तुडवत वेगळे पायंडे पाडले जात असतात. केंद्राचे सरकार, पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे नेते असतात. मग राज्यांतील सरकारे भले त्यांना मानणाऱ्या राजकीय पक्षाची नसोत. त्या राज्यांना अस्थिर करणे म्हणजे राष्ट्रीय एकतेस चूड लावण्यासारखे आहे. महाराष्ट्रातील घडामोडी हा चूड लावण्याचाच प्रकार आहे. अर्थात, महाराष्ट्राला चूड लावाल तर तुमची धोतरेही पेटतील हे विसरू नका.

OBC राजकीय आरक्षणाच्या अध्यादेशाच्या मुद्द्यावरुन राज्यपाल आणि मविआ सरकार पुन्हा आमने-सामने?

बक्षिसी म्हणून 'झेड प्लस' सुरक्षा

देशभरातच एकंदरीत कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बरी नाही. अनेक राज्यांत नक्षलवादी कारवाया वाढल्या असल्याने गृहमंत्री शहा यांना तातडीने मुख्यमंत्र्यांची बैठक बोलवावी लागली आहे. भाजपविरोधात सरकारे ज्या राज्यांत आहेत, तेथे अनेक भाजप पुढाली फक्त चिखलफेक करतात याची बक्षिसी म्हणून 'झेड प्लस' दर्जाची केंद्रीय सुरक्षा देण्यात आली आहे असंही सामनात म्हटलं आहे.

महंत नरेंद्र गिरी महाराजांवर आत्महत्येची वेळ

उत्तरप्रदेशातील प्रयागराजमध्ये महंत नरेंद्र गिरी महाराजांवर आत्महत्या करण्याची वेळ आली. आत्महत्या की हत्या हे ठरायचे आहे, पण इतक्या मोठ्या संताचा संशयास्पद मृत्यू हा कुणाला कायदा-सुव्यवस्था ढासळल्याचा पुरावा वाटत नाही. तसेच या विषयावर उत्तप्रदेश विधानसभेचे खास दोन-चार दिवसांचे अधिवेशन बोलावून चर्चा करावी असेही कोणाला वाटू नये?

चंद्रकांत पाटलांना कायदेशीर नोटीस पाठवणार, सव्वा रुपयाचा दावा दाखल करणार - संजय राऊत

इतर राज्यपालांना तशी चिंता वाटू नये?

मध्यप्रदेशातील रेवा जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर चार नराधमांनी बलात्कार केला आता तिच्या कुटुंबासही धमकावले जात आहे. हे काही चांगल्या कायदा-सुव्यवस्थेचे लक्षण नाही. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना आपल्या राज्यातील महिला अत्याचार, कायदा-सुव्यवस्था याबाबत चिंता वाटते तशी चिंता उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशातील राज्यपालांना का वाटू नये? की तेथील राजभवनाच्या संवेदाना मरून पडल्या आहेत? असा सवाल सामानातून विचारला आहे.

शपथ दिलेले सरकार अस्थिर करण्यासाठी लावणे कितपत योग्य?

खरे म्हणजे घटनाकारांनी नेमून दिलेल्या कर्तव्यांचे पालन राज्यपालांनी करणे बंधनकारक आहे. मात्र एखाद्या राज्याचे राज्यपाल जर राजभवनात बसून त्यांचे सर्व बळ त्यांनीच शपथ दिलेले सरकार अस्थिर करण्यासाठी लावत असतील तर ते कितपत योग्य आहे? आपल्या लोकशाहीचे हेच चित्र आज सर्वच स्तरांवर दिसत आहे. राज्यांना धडपणे काम करू द्यायचे नाही. राज्यातील आपल्या हस्तकांना संरक्षण देऊन त्यांना हवा तसा गोंधळ घालू द्यायची मुभा द्यायची. राज्यपालांसारख्या घटनात्मक संस्थांचे त्यासाठी अवमूल्यन करायचे. यामुळे देशाची संघराज्य व्यवस्थाच कोलमडून पडत आहे असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

First published:

Tags: Governor bhagat singh, Sanjay raut, Shiv sena