मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

महाराष्ट्रातील भाजप पक्षाचे डोके सरकले आहे का? सेनेनं फटकारले

महाराष्ट्रातील भाजप पक्षाचे डोके सरकले आहे का? सेनेनं फटकारले

'मुंबईतील (Mumbai) सिद्धिविनायक मंदिराच्या (siddhivinayak temple)ठिकाणी हे उपरे वाजतगाजत, गुलाल उधळत आणि नारे वगैरे लावत पोहोचले. भाजपने आंदोलन केले म्हणून देवांचे दरवाजे उघडले वगैरे बतावण्या करणे म्हणजे अकलेचे उरलेसुरले भांडवल दिवाळखोरीत निघाल्याचे प्रमाण आहे'

'मुंबईतील (Mumbai) सिद्धिविनायक मंदिराच्या (siddhivinayak temple)ठिकाणी हे उपरे वाजतगाजत, गुलाल उधळत आणि नारे वगैरे लावत पोहोचले. भाजपने आंदोलन केले म्हणून देवांचे दरवाजे उघडले वगैरे बतावण्या करणे म्हणजे अकलेचे उरलेसुरले भांडवल दिवाळखोरीत निघाल्याचे प्रमाण आहे'

'मुंबईतील (Mumbai) सिद्धिविनायक मंदिराच्या (siddhivinayak temple)ठिकाणी हे उपरे वाजतगाजत, गुलाल उधळत आणि नारे वगैरे लावत पोहोचले. भाजपने आंदोलन केले म्हणून देवांचे दरवाजे उघडले वगैरे बतावण्या करणे म्हणजे अकलेचे उरलेसुरले भांडवल दिवाळखोरीत निघाल्याचे प्रमाण आहे'

पुढे वाचा ...
  • Published by:  sachin Salve
मुंबई, 19 नोव्हेंबर : भारतीय जनता पक्षाला नक्की काय झाले आहे? महाराष्ट्रातील त्या पक्षाचे डोके सरकले आहे का? असे अनेक प्रश्न मऱ्हाटी जनतेला पडत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरांसह सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय घेतला. पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांचे दरवाजे भक्तांसाठी खुले झाले. मात्र हे सर्व श्रेय आमचेच, असा गोंधळ सुरू करून भाजपातील ‘उपऱ्यां’नी विजयोत्सव साजरा केला आहे, असं म्हणत शिवसेनेनं भाजपला सणसणीत टोला लगावला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून मंदिरं उघडण्याच्या श्रेयवादावरून भाजप नेत्यांना सणसणीत टोला लगावला आहे. 'पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांचे दरवाजे भक्तांसाठी खुले झाले. मात्र हे सर्व श्रेय आमचेच, असा गोंधळ सुरू करून भाजपातील ‘उपऱ्यां’नी विजयोत्सव साजरा केला आहे. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराच्या ठिकाणी हे उपरे वाजतगाजत, गुलाल उधळत आणि नारे वगैरे लावत पोहोचले. भाजपने आंदोलन केले म्हणून देवांचे दरवाजे उघडले वगैरे बतावण्या करणे म्हणजे अकलेचे उरलेसुरले भांडवल दिवाळखोरीत निघाल्याचे प्रमाण आहे. ज्यांचा भाजपशी किंवा हिंदुत्वाच्या विचारधारेशी काडीमात्र संबंध नव्हता असे बाजारबुणगे सत्तेसाठी भाजपमध्ये घुसले. ते उपरेच देवाच्या दारात श्रेयवादाचा गोंधळ घालीत आहेत. अशाने भाजपची पत वाढणार नसून ती उतारास लागत आहे याचे भान ठेवले नाही तर राज्यात त्यांचे हसे होईल' असं म्हणत सेनेनं भाजपचे आमदार राम कदम यांना सणसणीत टोला लगावला आहे. सुशांत प्रकरणात फेक न्यूजचा सुळसुळाट! युट्यूबरने कमावले लाखो, FIR दाखल 'बाटग्यांनी हिंदुत्वावर बोलावे किंवा सल्ले द्यावेत हा विनोदच म्हणावा लागेल. कुणीतरी एक बोगस ‘आचार्य’ पुढे करून मंदिरांचे टाळे उघडा यासाठी आंदोलन केले. कोण कुठले हे आचार्य? पण भाजपला फुकटात नाचायला लोक मिळतात. ते भाड्याने वापरून महाराष्ट्र सरकारच्या नावाने शिमगा करायचा हा त्यांचा रिकाम्या वेळेतला उद्योग झाला आहे' असा टोलाही सेनेनं लगावला आहे. 'मुळात गेल्या आठ महिन्यांपासून मंदिरेच काय, सर्वच धर्मीय प्रार्थनास्थळे बंद होती, ती जनतेच्या आरोग्यासाठी, जिवाचे रक्षण करण्यासाठी. हा केंद्र सरकारचाच आदेश होता. जसजसे कोरोनाचे संकट निवळत गेले तसतसे एक-एक क्षेत्र उघडण्यात आले. हे सर्व केंद्राच्याच सूचनांनुसार घडत होते. त्यामुळे भाजपतील उपऱ्या व नाच्या हिंदुत्ववाद्यांना मंदिरे उघडा असे आंदोलन करायचे होते तर त्यांनी ते पंतप्रधान मोदी यांच्या घरासमोरच करायला हवे होते. दिल्लीतील जंतरमंतर रोड, रामलीला मैदान, विजय चौकात घंटा, थाळ्या वाजवून मंदिरे उघडा असे आपल्या पंतप्रधान, राष्ट्रपतींना सांगता आले असते, पण त्यांनी ढोल-ताशे वाजवले ते महाराष्ट्रात. हे तर बिनबुडाचेच राजकारण आहे' अशी टीकाही सेनेनं केली. नव्या कोऱ्या गाडीला 30 मीटर उंचीवरून खाली फेकलं, अशी झाली गाडीची अवस्था 'भारतीय जनता पक्षाचे मंदिर किंवा धर्मप्रेम कसे फसवे आहे ते पहा. मुंबादेवी, मुंबामाता हे मुंबईचे आराध्य दैवत. याच मुंबामातेवरून ‘मुंबई’ नाव पडले. त्या मुंबईचा अपमान करणाऱ्या ‘उपऱ्या’ नटीचा ‘जय जय’ करताना यांचे देवदेवतांचे प्रेम आणि श्रद्धा कोठे अडकल्या होत्या? आता ते ‘छटपूजे’स परवानगी मिळावी म्हणून राजकीय आंदोलन करीत आहेत. छटपूजेस एरवी कधीच परवानगी नाकारली नाही, पण यानिमित्ताने समुद्रकिनारी जो प्रचंड जनसमुदाय जमा होतो तो कोरोना काळात योग्य आहे काय, याचा सारासार विचार करण्याची बुद्धी ते गमावून बसले आहेत. जेथे भाजपचे मुख्यमंत्री नाहीत तेथे ते अशा प्रकारची आंदोलने करून लोकांना संकटात ढकलत आहेत. हे क्रौर्यच म्हणायला हवे. हरयाणात घाईघाईने शाळा सुरू केल्या. तेथे पाचशेहून जास्त विद्यार्थी व शिक्षक कोरोनाग्रस्त झाले आहेत. याचे भान महाराष्ट्रातील नाचऱ्या, उपऱ्या हिंदुत्ववाद्यांनी ठेवले तर मेहेरबानी होईल', असा टोलाही सेनेनं भाजप नेत्यांना लगावला आहे.
First published:

Tags: राम कदम

पुढील बातम्या