Home /News /mumbai /

महाराष्ट्राशी बेइमानी करणाऱ्यांचे काय होणार? 'सामना'च्या अग्रलेखातून सवाल

महाराष्ट्राशी बेइमानी करणाऱ्यांचे काय होणार? 'सामना'च्या अग्रलेखातून सवाल

महाराष्ट्रातील सरकारला खाली खेचण्याची एकही संधी भाजपवाले सोडत नाहीत. अडीच वर्षांपूर्वी अजित पवारांचे प्रकरण पहाटे झाले. त्यात यश आले नाही. आता तेच अस्वस्थ आत्मे एकनाथ शिंदे यांच्या मानगुटीवर बसून ‘ऑपरेशन कमळ’ घडवीत आहेत.

    मुंबई, 22 जून : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Sinde) यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या घडमोडींमुळे राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. राज्यातील महाविकास आघाडीची  (Mahavikas Aghadi) सत्तापालट होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यात आता भाजपचे काही नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत दिसल्याने अनेक गोष्टी हळूहळू स्पष्ट आहेत. या सर्व घडामोडींवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून (Saamana Editorial) सडकून टीका करण्यात आली आहे. महाराष्ट्रातल्या सरकारचे काय व कसे होणार, हा प्रश्न नसून महाराष्ट्रावर वार करणाऱ्यांचे, महाराष्ट्राशी बेइमानी करणाऱ्यांचे काय होणार? असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे. सत्तेचा माज दाखवून फोडाफोडीचं राजकारण सुरु "केंद्रीय सत्तेचा माज दाखवून महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. आईचे दूध विकणारी अवलाद शिवसेनेत नको, असे शिवसेनाप्रमुख नेहमी म्हणत. असे लोक शिवसेनेत निर्माण व्हावेत ही महाराष्ट्राच्या मातीशी बेइमानीच आहे. शिवसेना ही आई. तिच्या आणा-भाका घेऊन राजकारण करणाऱ्यांनी आईच्या दुधाचा बाजार मांडला. त्या बाजारासाठी जागा निवडावी सुरतची. हा योगायोग समजायचा काय? छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती व त्याच सुरतमधून आज महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घालण्याचे प्रयोग सुरू आहेत. भारतीय जनता पक्षाच्या डोळ्यात महाराष्ट्राचे ठाकरे सरकार खुपत आहे, त्यापेक्षा जास्त शिवसेना खुपत आहे. त्यामुळे आधी शिवसेनेवर वार करा व मग महाराष्ट्रावर घाव घाला, असे राजकारण स्पष्ट दिसते", अशी टीका सामना अग्रलेखातून भाजपवर करण्यात आली आहे. भाजपची अखेर एंट्री, एकनाथ शिंदेंसोबत दिसले भाजपचे २ नेते "फितुरीचे बीज रोवणाऱ्यांचे काय होणार? धर्माच्या मुखवट्याखाली अधर्माशी संग करणाऱ्यांना जनता माफ करील काय? हे खरे प्रश्न आहेत. संकटांशी व वादळांशी सामना करण्याची शिवसेनेला सवय आहे. गुजरातच्या भूमीवरून फडफड करणाऱ्यांनी हा इतिहास पुन्हा एकदा समजून घ्यावा! गुजरातमध्ये या मंडळींनी जरूर दांडिया खेळावा, पण महाराष्ट्रात तलवारीस तलवार भिडेल हे नक्कीच!", असा इशाराही अग्रलेखातून देण्यात आलाय. सुरतमधून निघतानाचा एकनाथ शिंदे यांचा पहिला व्हिडीओ समोर एकनाथ शिंदे यांच्या मानगुटीवर बसून ‘ऑपरेशन कमळ’ "महाराष्ट्रातील सरकारला खाली खेचण्याची एकही संधी भाजपवाले सोडत नाहीत. अडीच वर्षांपूर्वी अजित पवारांचे प्रकरण पहाटे झाले. त्यात यश आले नाही. आता तेच अस्वस्थ आत्मे एकनाथ शिंदे यांच्या मानगुटीवर बसून ‘ऑपरेशन कमळ’ घडवीत आहेत. काही करून राज्यातील सरकार घालवायचे याच ईर्षेने त्यांना झपाटलेले आहे."
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Eknath Shinde, Shivsena

    पुढील बातम्या