शेतकऱ्यांच्या प्रेतांचा खच रोखणे हा ड्रीम प्रोजेक्ट नाही का? - उद्धव ठाकरे

शेतकऱ्यांच्या प्रेतांचा खच रोखणे हा ड्रीम प्रोजेक्ट नाही का? - उद्धव ठाकरे

  • Share this:

19 मे : समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई हे मुख्यमंत्री फडणवीस यांचे ‘ड्रीम प्रोजेक्ट’ आहे. मग शेतकऱ्यांच्या प्रेतांचा खच रोखणे हे त्यांचे ड्रीम प्रोजेक्ट का असू नये?, असा खरमरीत सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. भाव मागणा-या शेतकऱ्यांना शिविगाळ केली जात आहे. शेतकऱ्यांना गुलाम केलं जात आहे. त्याविरोधात आता शिवसेना गर्जना करणार आहे आणि ही गर्जना सिंहासनास हादरा देईल असाही दावा शिवसेनेनं केला आहे.

कर्जमुक्ती मिळावी म्हणून नाशिक जिल्ह्यातील १४० गावांतील शेतकरी संपावर जात आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक 'सामना'मधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.

शेतीला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफीचा आक्रोश सुरू आहे, मात्र सरकार म्हणते शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळे प्रेतांचे ढिगारे पडले तरी बेहत्तर पण कर्जमाफी मिळणार नाही. या प्रेतांच्या ढिगाऱ्यावर बसून मोदी फेस्टिव्हल साजरा करणाऱ्या सरकारच्या विरोधात शेतकरी गर्जना करणार असेल तर फडणवीसांचे सरकार त्या गरीब शेतकऱ्यास देशद्रोही ठरवून फासावर लटकवणार आहे काय?, असा संत्पत सवालही शिवसेनेने उपस्थित केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 19, 2017 10:15 AM IST

ताज्या बातम्या