Home /News /mumbai /

'टुटे मन से कोई खडा नही होता' शिवसेनेचा फडणवीसांना वाजपेयींच्या कवितेतून टोला

'टुटे मन से कोई खडा नही होता' शिवसेनेचा फडणवीसांना वाजपेयींच्या कवितेतून टोला

उपमुख्यमंत्री होणारे अचानक मुख्यमंत्री झाले आणि हमखास मुख्यमंत्री होणार असे वाटणाऱ्यांना उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावे लागले.

उपमुख्यमंत्री होणारे अचानक मुख्यमंत्री झाले आणि हमखास मुख्यमंत्री होणार असे वाटणाऱ्यांना उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावे लागले.

उपमुख्यमंत्री होणारे अचानक मुख्यमंत्री झाले आणि हमखास मुख्यमंत्री होणार असे वाटणाऱ्यांना उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावे लागले. उपमुख्यमंत्री होणारे अचानक मुख्यमंत्री झाले आणि हमखास मुख्यमंत्री होणार असे वाटणाऱ्यांना उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावे लागले.

पुढे वाचा ...
      मुंबई,02 जून : '‘काळ्याचे पांढरे व पांढऱ्याचे काळे करणारे नवे युग आता तिथे अवतरले आहे. त्यामुळेच ‘छोटे मन’ आणि ‘मोठे मन’ यांच्या व्याख्या नव्याने सांगितल्या जात आहेत. कराराप्रमाणे दिलेला शब्द पाळण्याचे ‘मोठे मन’ भाजपने अडीच वर्षांपूर्वीच दाखवले असते तर बचाव म्हणून ‘मोठ्या मना’ची ढाल समोर करण्याची वेळ त्या पक्षावर आली नसती, असं म्हणत शिवसेनेनं (shivsena) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांना लगावला. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी पार पडला आहे. एकनाथ शिंदे यांनी अचानकपणे मुख्यमंत्रिपदाची घोषणा करण्यात आली. तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदी शपथ घेतली. भाजपमध्ये फडणवीस यांचं खच्चीकरण करण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. याच मुद्याला धरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या (saamana) अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री होणारे अचानक मुख्यमंत्री झाले आणि हमखास मुख्यमंत्री होणार असे वाटणाऱ्यांना उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावे लागले. पक्षादेश म्हणून ते त्यांनी स्वीकारलेही. या ‘क्लायमॅक्स’वर टीका, समीक्षण, परीक्षण असा भडिमार होत असताना ‘मोठे मन’ आणि ‘पक्षनिष्ठेचे पालन’ असा एक बचाव समोर आला. ‘‘फडणवीस यांनी मन मोठे करून मुख्यमंत्रिपदाऐवजी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले’’, असा युक्तिवाद आता केला जात आहे. भारतीय जनता पक्षाचे स्वर्गीय नेते अटलबिहारी वाजपेयी यांनीही आपल्या एका कवितेत म्हटलेच आहे… छोटे मन से कोई बडा नही होता, टुटे मन से कोई खडा नही होता मात्र, या ओळींपूर्वी याच कवितेत वाजपेयी म्हणतात, हिमालय की चोटी पर पहुंच, एव्हरेस्ट विजय की पताका फहरा, कोई विजेता यदि ईर्ष्या से दग्ध, अपने साथी से विश्वासघात करे तो उसका क्या अपराध इस लिये क्षम्य हो जायेगा कि वह एव्हरेस्ट की उंचाई पर हुआ था? नहीं, अपराध अपराध ही रहेगा हिमालय की सारी धवलता उस कालिमा को नहीं ढक सकती! अर्थात ‘मन’ आणि ‘अपराध’ यांची सुस्पष्ट व्याख्या मांडणाऱ्या वाजपेयी युगाचा आणि त्यांच्या विचारसरणीचा देशाच्या राजकारणातून केव्हाच अस्त झाला आहे, असा टोला सेनेनं फडणवीस यांना लगावला. (मुख्यमंत्री होणार हे कधी समजलं? एकनाथ शिंदेंचं उत्तर वाचून बसेल आश्चर्याचा धक्का) 'काळ्याचे पांढरे व पांढऱ्याचे काळे करणारे नवे युग आता तिथे अवतरले आहे. त्यामुळेच ‘छोटे मन’ आणि ‘मोठे मन’ यांच्या व्याख्या नव्याने सांगितल्या जात आहेत. कराराप्रमाणे दिलेला शब्द पाळण्याचे ‘मोठे मन’ भाजपने अडीच वर्षांपूर्वीच दाखवले असते तर बचाव म्हणून ‘मोठय़ा मना’ची ढाल समोर करण्याची वेळ त्या पक्षावर आली नसती, असा टोलाही सेनेनं शिंदेंना लगावला. (प्रवासाचा योग आहे पण प्रकृतीलाही जपा; सविस्तर पाहा तुमचं आजचं राशिभविष्य) 'लोकशाहीचे वस्त्रहरण करून घडविण्यात आलेल्या महाराष्ट्रातील या राजकीय नाटय़ाचे आणखी किती अंक समोर येणार हे आता बघावे लागेल. जे झाले ते झाले, पण महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री आणि पक्षादेश शिरोधार्य मानणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांच्या हातून महाराष्ट्रहिताचेच कार्य घडो हीच अपेक्षा आहे. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, आंधळा धृतराष्ट्र नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा टोलाही सेनेनं लगावला.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Maharashtra News

    पुढील बातम्या