मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /नाणार प्रकल्पावरून शिवसेना आक्रमक, शिंदे सरकाराला दिला थेट इशारा

नाणार प्रकल्पावरून शिवसेना आक्रमक, शिंदे सरकाराला दिला थेट इशारा

'कोकणात पाप व ढोंग चालत नाहीत. ही कोकणची परंपरा नाही. श्री देवी भराडी मातेचा कोप होईल व तुमचे राज्य गुवाहाटीच्या रेड्याप्रमाणे बळी जाईल'

'कोकणात पाप व ढोंग चालत नाहीत. ही कोकणची परंपरा नाही. श्री देवी भराडी मातेचा कोप होईल व तुमचे राज्य गुवाहाटीच्या रेड्याप्रमाणे बळी जाईल'

'कोकणात पाप व ढोंग चालत नाहीत. ही कोकणची परंपरा नाही. श्री देवी भराडी मातेचा कोप होईल व तुमचे राज्य गुवाहाटीच्या रेड्याप्रमाणे बळी जाईल'

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 06 फेब्रुवारी : 'नाणारचा प्रकल्प करू नका असा भराडी देवीचाच कौल आहे व तो कौल टाळून काही कराल तर देवीचा कोप होईल. इतके ते जागरूक देवस्थान आहे. बेमालूम पद्धतीने फडणवीस यांनी भराडी देवीच्या साक्षीने नाणार रिफायनरीबाबत थाप मारली! कोकणात पाप व ढोंग चालत नाहीत. ही कोकणची परंपरा नाही. श्री देवी भराडी मातेचा कोप होईल व तुमचे राज्य गुवाहाटीच्या रेड्याप्रमाणे बळी जाईल' अशी जळजळीत टीका शिवसेनेनं केली आहे.

नाणार प्रकल्पावरून राज्यात आता पुन्हा एकदा राजकीय वाद पेटण्याची चिन्ह आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आंगणेवाडीच्या भराडी मातेच्या दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी नाणार प्रकल्प होणारच अशी ग्वाही दिली. याच मुद्यावरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे.

(...तर पहिली गोळी झेलायला तयार, विनायक राऊत थेट बोलले, काय आहे कारण?)

'भराडी मातेचा इतिहास असे सांगतो की, जे पापी मनाने दर्शनास गेले त्यांना ती चांगलीच अद्दल घडवते व जे सत्कार्य करून गेले त्यांना आशीर्वाद देते. येथे जादूटोणा, जंतर मंतर वगैरे चालत नाही. त्यामुळे फडणवीस तेथे गेले. माता त्यांना सुबुद्धी देईल. याआधी अनेक नेत्यांनी भराडी देवीकडे राजकीय शक्तिप्रदर्शन करून सत्ता व पैशांची मस्ती दाखविण्याचा प्रयत्न केला. त्या सगळ्यांचा कोकणात पराभव झाला. भराडी देवीच्या दरबारात गद्दार वृत्तीच्या ढोंगी भाविकांना अजिबात मान व स्थान नाही हे समजून घेतले पाहिजे' असा टोला सेनेने फडणवीस आणि शिंदेंना लगावला.

'फडणवीस हे भराडी देवीच्या दर्शनासाठी कोकणात आले होते की कोकणचे स्मशान करणाऱ्या नाणार रिफायनरीची वकिली करण्यासाठी आले होते? आंगणेवाडीतील जाहीर सभेत फडणवीस म्हणाले, ‘‘नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत लोकांची दिशाभूल केली गेली. हा प्रकल्प आणला तर आंबे येणार नाहीत. असे खोटे सांगितले गेले. मच्छीमारांना सांगितलं गेलं की, मच्छीमारी होणार नाही. रिफायनरीविरुद्ध खोटा प्रचार करून कोकणचे नुकसान केले. आता आम्ही कोकणात रिफायनरी आणणारच!’’ फडणवीस यांनी असा पहेलवानकी षड्डू आंगणेवाडीच्या जत्रेत ठोकला, पण कोकणातील जत्रेत कुस्त्यांचे फड होत नाहीत व कोणी बाहेरच्या पहेलवानाने उगाच येऊन पिचक्या मांडीवर थाप ठोकली तरी कोकणची जनता त्यास धूप घालत नाही. फडणवीस हे कोणत्या गुंगीत आहेत? एकतर मुख्यमंत्रिपद गेल्यामुळे ते भरकटले आहेत व 2024 सालाआधीच त्यांचे ‘रेडे’ सरकार कोसळणार याची खात्री पटल्याने ते थयथयाट करीत आहेत' अशी टीका सेनेनं केली.

(युती शिवसेनेसोबत पण...कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीवरून वंचितचा गुगली!)

'रिफायनरी हवी की नको हे जनता ठरवेल. जनतेच्या फळबागा, शेती, मासेमारी कायमची संपवून कोणी विकासाची भाषा करणार असेल तर तो कोकणी जनतेला संपवण्याचा डाव आहे. कोकणात वायुप्रदूषण व जलप्रदूषण वाढवणारेच प्रकल्प का आणता? अशा प्रकल्पांमुळे तारापूरसारख्या भागात काय हाहाकार माजला आहे ते पहा. पहिले म्हणजे नाणार रिफायनरी कोकणात आणण्यापेक्षा गुजरातने महाराष्ट्रातून पळवून नेलेला वेदांत फॉक्सकॉन, एअरबस, ड्रग्स पार्कसारखे प्रकल्प पुन्हा खेचून घेऊन या व त्यातला एखादा मोठा प्रकल्प नाणारात उभा करा. तसे करणार असाल तर तुम्ही खरे, नाहीतर थापा मारत आहात'

तेथेच नाणार प्रकल्प येणार म्हणून शेकडो परप्रांतीय उद्योगपती व व्यापाऱ्यांनी कोकणात नाणारच्या आसपास जमिनी खरेदी केल्या. नाणार आणला नाही तर या सगळ्यांचे नुकसान होईल. हे सर्व परप्रांतीय जमीनदार भाजपचे अर्थपुरवठादार असल्याने फडणवीस त्यांच्या फायद्याची भाषा बोलत आहेत. कोकणची संस्कृती नष्ट करणारे हे जमीनदार व त्यांची पाठराखण करणारे फडणवीस व त्यांचे सरकार हेच कोकणच्या मुळावर उठले आहेत. त्यामुळे आंगणेवाडीत राजकीय जत्रा भरवून कोकणी जनतेला भूल देता येणार नाही. फडणवीस म्हणतात, ‘भराडी देवीने आम्हाला कौल दिल्याने आम्ही सत्तेत आलो.’ ही तर सगळय़ात मोठी थाप आहे. भराडी देवीवर इतका विश्वास होता तर मग खोके आमदार गुवाहाटीत रेडय़ांवर स्वार होऊन का गेले? असा सवालही सेनेनं विचारत शिंदेंना टोला लगावला.

First published:

Tags: देवेंद्र फडणवीस, शिवसेना