मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /अखेर रुपाली चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड, उद्या स्वीकारणार पदभार!

अखेर रुपाली चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड, उद्या स्वीकारणार पदभार!

रुपाली चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. आज राज्य सरकारकडून याबद्दल अधिसूचना काढण्यात आली आहे.

रुपाली चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. आज राज्य सरकारकडून याबद्दल अधिसूचना काढण्यात आली आहे.

रुपाली चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. आज राज्य सरकारकडून याबद्दल अधिसूचना काढण्यात आली आहे.

मुंबई, 20 ऑक्टोबर : गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर (Chairperson of State Women Commission) राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांची अखेर नियुक्ती झाली आहे. याबद्दल राज्य सरकारकडून याबद्दल अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. ( Rupali Chakankar chairperson of the State Womens Commission)

रुपाली चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. आज राज्य सरकारकडून याबद्दल अधिसूचना काढण्यात आली आहे.  रुपाली चाकणकर या उद्या महिला आयोगाच्या पदभार स्वीकारणार आहे, अशी माहिती मिळाली आहे.

चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकल्यानंतर रुपाली चाकणकर यांना बढती मिळाली होती. त्यांनी या संधीच सोनं करत वेळोवेळी भाजपवर चांगलाच हल्लाबोल केला. भाजपकडून चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर यांच्यात अनेक वेळा शाब्दिक युद्ध सुद्धा पाहण्यास मिळालं.

T20 World Cup मधला Sixer King कोण? कोणाच्या नावावर सर्वाधिक रन आणि विकेट?

अलीकडेच जेव्हा रुपाली चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी निवड झाल्याची बातमी समोर आली तेव्हाही चित्रा वाघ यांचा चांगलाच तिळपापड झाला.    यावरुन चित्रा वाघ यांनी ट्विट करत 'महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरताहेत पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजिरवाणं आहे. अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका. अन्यथा प्रत्येकवेळी सरकारचंच नाक कापलं जाईल' असं वादग्रस्त ट्विट चित्रा वाघ यांनी केलं होतं. त्यांच्या या ट्वीटनंतर एकच गोंधळ उडाला होता.

T20 World Cup मध्ये 2 जर्सीत का उतरली ऑस्ट्रलियाची टीम? मोठं कारण आलं समोर

परंतु, रुपाली चाकणकर यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. अखेरीस आज रुपाली चाकणकर यांची अधिकृत निवड झाली असून उद्या त्या पदभार स्विकारतील. रुपाली चाकणकर यांच्या रुपाने गेल्या अनेक काळापासून रखडलेल्या महिला आयोगाला अध्यक्ष मिळाले आहे.

First published:
top videos

    Tags: NCP