चित्रा वाघ यांच्या या पोस्टवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केलीय. राजकीय उदरनिर्वाहासाठी बेताल वक्तव्य करणाऱ्या काही लोकांना नवीन वसुलीमंत्री कोण याची काळजी लागली होती. एकीकडे मी पवार साहेबांच्या तालमीत वाढले, ते माझे बाप आहेत म्हणायचं आणि दुसरीकडे असं अशोभनीय वक्तव्य करायचा दुटप्पीपणा कसा जमत असेल? असा सवाल रुपाली चाकणकर यांनी उपस्थित केला. कर्तव्यनिष्ठ ही दिलीपराव वळसे पाटीलसाहेबांची ओळख आहे. कारवाई होऊ नये म्हणून पक्ष बदलणाऱ्या लाचखोरांनी जरी त्यांना आज शुभेच्छा दिल्या असल्या तरी ते अशा गुन्हेगारांना सोडणार नाहीत, असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. चित्रा वाघ यांनी वळसे पाटलांना शुभेच्छा दिल्यानंतर रुपाली चाकणकरांना एवढा राग का आला यामागंही कारण आहे. चित्रा वाघ यांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर केलेल्या ट्विटमध्ये आता नवा वसुली मंत्री कोण असणार असा? सवाल करत राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली होती.दिलीप वळसे-पाटील साहेब राज्याचे नविन गृहमंत्री
महाराष्ट्रात महिला मुलींवर होणार्या अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी कठोर पावले उचलतं घटनांची तात्काळ दखल घ्याल ह्या अपेक्षांसह मन:पुर्वक शुभेच्छा @Dwalsepatil @Dev_Fadnavis @MahaPolice @MumbaiPolice pic.twitter.com/C8FVyK55da — Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) April 6, 2021
रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी चित्रा वाघ यांच्या, त्या ट्विटलाही फेसबूक पोस्टद्वारे उत्तर दिलं होतं. चित्रा ताईंचा नवरा भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकलेला आरोपी असून त्यांच्यावर रीतसर गुन्हा दाखल आहे आणि ताई विचारत आहेत नवीन वसुली मंत्री कोण?? अहो ताई भावनेच्या भरात इतकंही वाहून जाऊ नका की अंगलट आलं की परत 'पवार साहेब माझ्या वडिलांसारखेच आहेत' हे म्हणायची वेळ येईल. थोडा धीरज रखो , सब सच सामने आयेगा.!! असं रुपाली चाकणकर यांनी त्यांना म्हटलं होतं. एकूणच चित्रा वाघ यांच्या टीकेला उत्तर देताना रुपाली चाकणकर यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आधी टीका केली आणि नंतर पतीवर कारवाई होऊ नये म्हणून शुभेच्छांची पोस्ट केल्याचं रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या पोस्टमधून अप्रत्यक्षरित्या म्हटलं आहे. आता भविष्यात हा वाद आणखी किती वाढत जाणार हे समोर येईलच. पण पक्षाची बाजू मांडण्यासाठी एकेकाळी एकत्र काम केलेले कार्यकर्तेही एकमेकांवर आक्रमकपणे हल्ला प्रतिहल्ला करत असल्याचं आता पाहायला मिळत आहे.Home Minister of Maharshtra @AnilDeshmukhNCP Finally Resigns !
Now the question arises that who will be the New Vasooli Minister?? Change of face won't change the Corrupt intentions of the MVA Government.@Dev_Fadnavis @ChDadaPatil @BJP4Maharashtra#AnilDesmukh — Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) April 5, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Chitra wagh, NCP