S M L

मुंबईत भाडं नाकारणाऱ्या मुजोर रिक्षाचालकांवर आरटीओची धडक कारवाई,न्यूज18लोकमतचा इम्पॅक्ट

आता वाहतूक शाखेचे पोल्स कर्मचारी हे सर्वसामान्य प्रवासी बनून कारवाई करतील. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी न्यूज१८ लोकमतनं भाडं नाकारणाऱ्या रिक्षाचालकांचा मनमानी कारभार पुढे आणला होता.

Sonali Deshpande | Updated On: Apr 16, 2018 11:42 AM IST

मुंबईत भाडं नाकारणाऱ्या मुजोर रिक्षाचालकांवर आरटीओची धडक कारवाई,न्यूज18लोकमतचा इम्पॅक्ट

मुंबई, अक्षय कुडकेलवार, 16 एप्रिल : रिक्षाचालकाच्या भाडं नाकारणं, उर्मटपणा याचा मुंबईकरांना नेहमीच अनुभव येतो. मात्र आता भाडं नाकरल्यास रिक्षाचालकांवर कारवाईची सुरुवात झालीय. एरवी गणवेशातील वाहतूक विभागाचे कर्मचारी बघितल्यास रिक्षाचालक सावध व्हायचे, मात्र आता वाहतूक शाखेचे पोल्स कर्मचारी हे सर्वसामान्य प्रवासी बनून कारवाई करतील. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी न्यूज१८ लोकमतनं भाडं नाकारणाऱ्या रिक्षाचालकांचा मनमानी कारभार पुढे आणला होता.

हिंगोलीच्या जिल्ह्याच्या पोलिस उपअधिक्षक  सुजाता पाटील यांना काही दिवसांपूर्वी रिक्षाचालकांच्या मनमानीचा अनुभव आला होता. या प्रकाराबाबत त्यांनी सोशल मीडियावर जाहीर वाच्यता करत स्थानिक पोलिसांवर ताशेरे ओढले होते. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. मात्र पोलिस अनुपस्थित असताना भाडं नाकारणं सुरू होतं. त्यावर  वाहतूक विभागानं ही शक्कल लढवलीय.

अशा प्रकारची मोहीम संपूर्ण शहरात राबण्यात येईल अशी माहिती परिवहन मंत्री कार्यलयानं दिलीय. तर कालच्या दिवसभरात अंधेरी स्थानकाबाहेर वाहतूक अधिकारी अभय देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ५५ रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 16, 2018 11:42 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close