तसंच, दाभाडकर यांची स्थिती गंभीर असल्याने मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला होता. दाभाडकर यांनी स्वतः व त्यांच्या जावयाने Forcefully DAMA ( Discharge against Medical Advice) अंतर्गत स्वतः च्या जबाबदारीवर घरी जाण्याची लेखी परवानगी मागितली होती. या पत्रात कोणत्याही तरुणाचा उल्लेख नाही' असंही सावंत यांनी सांगितलं. तसंच, 'या माहिती नंतरही स्व. नारायण दाभाडकर यांच्याबद्दलचा आमच्या मनातील आदर कमी होणार नाही. त्यांना राजकारणात ओढणे हे अयोग्य आहे. त्यांनी जरी असे पाऊल उचलले असते तरी त्याचा संघाशी संबंध जोडणे हे उचित नव्हते. स्व. नारायण दाभाडकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली' असंही सावंत म्हणाले. काय आहे प्रकरण? एप्रिल महिन्यात नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवर असणारे नारायण भाऊराव दाभाडकर नागपूरमध्ये एका रुग्णालयात भरती झाले होते. त्यांची ऑक्सिजनची पातळी 60 वर आल्याने त्यांच्या मुलीने आणि जावयाने त्यांनी इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात भरती केलं होतं. त्याठिकाणी महिला तिच्या चाळीशीतल्या नवऱ्याला ऑक्सिजन बेड मिळण्यासाठी प्रयत्न करत होती. तिचं दु:ख नारायण दाभाडकर पाहू शकले नाहीत आणि त्यांनी मोठ्या निर्धाराने स्वत:चा बेड या स्त्रीच्या नवऱ्याला देण्याचं ठरवलं.स्व नारायण दाभाडकर यांच्या मृत्यूचा उपयोग संघाच्या प्रतिमा संवर्धनासाठी करण्याचा अश्लाघ्य प्रकार भाजपाने केला. यात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री @ChouhanShivraj व अनेक भाजपा संघाचे नेते सहभागी झाले. वस्तुस्थिती माहिती अधिकारात समोर आली आहे. हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरची सुविधा नव्हती pic.twitter.com/M4ykmiGQb3
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) June 17, 2021
याबद्दल मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्वीट करून सांगितले की, 'मी जीवन जगलो आहे, या महिलेच्या पतीचा मृत्यू झाला तर त्यांची मुलं अनाथ होतील असं म्हणत ते त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले'. शिवराज सिंह चौहान यांच्या ट्वीटमुळे एकच खळबळ उडाली होती. काँग्रेससह अनेकांनी असा प्रकार घडलाच नव्हता असा दावा केला होता. त्यामुळे वाद निर्माण झाला होता.“मैं 85 वर्ष का हो चुका हूँ, जीवन देख लिया है, लेकिन अगर उस स्त्री का पति मर गया तो बच्चे अनाथ हो जायेंगे, इसलिए मेरा कर्तव्य है कि मैं उस व्यक्ति के प्राण बचाऊं।'' ऐसा कह कर कोरोना पीडित @RSSorg के स्वयंसेवक श्री नारायण जी ने अपना बेड उस मरीज़ को दे दिया। pic.twitter.com/gxmmcGtBiE
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) April 27, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.