भाजप-शिवसेना युतीच्या चर्चेसाठी संघही 'दक्ष', भागवत करणार मध्यस्थी!

'हिंदुत्ववादी पक्ष संघटना एकमेकांच्या विरुद्ध लढू नये. जागावाटपाचे जे काही मुद्दे असतील ते सामजस्यांनी सोडवावे. एकमेकांशी असलेला अबोला सोडून हिंदुत्वासाठी एकत्र आलं पाहिजे.'

News18 Lokmat | Updated On: Feb 13, 2019 04:34 PM IST

भाजप-शिवसेना युतीच्या चर्चेसाठी संघही 'दक्ष', भागवत करणार मध्यस्थी!

मुंबई, 13 फेब्रुवारी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेत युतीची चर्चा अजून सुरू झालेली नाही. त्यामुळे आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने युतीसाठी मध्यस्थी करण्यासाठी पुढाकार घेणार आहे. मतांची विभागणी टाळण्यासाठी संघ मध्यस्थी करणार आहे.

'लोकसभा निवडणुकीत युतीची चर्चा पुढे सरकत नाही. त्यामुळे मतांची विभागणी टाळण्यासाठी आता थेट राष्ट्रीय स्वयंवसेक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनाच मध्यस्थी करावी लागणार आहे. हिंदुत्ववादी पक्ष संघटना एकमेकांच्या विरुद्ध लढू नये. जागावाटपाचे जे काही मुद्दे असतील ते सामजस्यांनी सोडवावे. एकमेकांशी असलेला अबोला सोडून हिंदुत्वासाठी एकत्र आलं पाहिजे. त्यासाठी येत्या काही दिवसांत भाजपची राष्ट्रीय कोअर टीम आणि शिवसेनेची कोअर टीम यांची एकमेकांशी चर्चा होणार आहे.

दोन्ही पक्षांच्या शिष्टमंडळात वरीष्ठ नेत्यांचा समावेश असणार आहे. या शिष्टमंडळाची पहिली चर्चा 'मातोश्री'वरच करण्याची शिवसेनेची मागणी आहे. त्याला भाजपनेही अनुकूलता दाखवली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि इतरनेते 'मातोश्री'वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन युतीची चर्चा पुढे नेतील अशी शक्यता निर्माण झाली आहे.

मात्र, शिवसेनेनं लोकसभा निवडणुकीपूर्वीच विधानसभा निवडणूक जागावाटप अंतिम करण्याची अट ठेवली आहे. या अटी संदर्भातही भाजप सकारात्मक असल्याचं बोललं जातं आहे. मात्र, तरी ही युतीतली चर्चा सशक्तपणे पुढे गेली नाही तर शिवसेनेचं मन वळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीचं 'मातोश्री'वर येऊन युतीतल्या वादांना पुर्णविराम देतील अशी ही शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रात युतीचा बिहार पॅटर्न?

Loading...

लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना सर्वांच्या मुखी एकच चर्चा ऐकायला मिळत आहे. शिवसेना – भाजप युतीचं काय? युती होणार कि स्वबळावर लढणार? कोण जिंकणार सर्वाधिक जागा? अशातच शिवसेनेनं भाजपसमोर 1995च्या फॉर्म्युल्यानुसार चालण्याचा आग्रह धरल्यानं भाजप शिवसेनेसमोर नमते घेणार का? अशी चर्चा सध्या दिवसभर रंगताना दिसत आहे. या साऱ्या घडामोडींकडे पाहिल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण देखील 'बिहार'च्या वाटेवर आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

काय झालं बिहारमध्ये?

कारण, बिहारमध्ये देखील लोकसभेच्या जागा वाटप करताना भाजपनं जदयू समोर अर्थात नितीश कुमार यांच्यापुढे नमतं घेतलं. नव्या फॉर्म्युल्यानुसार लोकसभेच्या एकूण 40 जागांपैकी जदयू 17, भाजप 17 आणि रामविलास पासवान यांची लोकजनशक्ती पार्टी 6 जागा लढवेल असा फॉर्म्युला ठरला. 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला 22, लोकजशक्ती पार्टीला 6 आणि भाजपविरोधात लढणाऱ्या जदयूला केवळ 2 जागा जिंकता आल्या होत्या.

पण, बिहारमधील नितीश कुमार यांचं वाढतं महत्त्व लक्षात घेता भाजपनं नितीश कुमार यांच्यासमोर नमतं घेतल्याचं चित्र पाहायाला मिळालं. त्यामुळे शिवसेनेना ताठर भूमिका घेत नितीश कुमार यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतंय. त्यामुळे भाजप देखील 'चक्रव्युहात' अडकल्याचं पाहायाला मिळत आहे.

मित्र पक्षांची नाराजी भाजपला परवडेल?

भाजप त्याहीपेक्षा नरेंद्र मोदी – अमित शहा जोडीवर टीका करत मित्रपक्षांनी आपली नाराजी उघड केली आहे. चंद्रबाबु नायडू अर्थात टीडीपीनं भाजपचा पाठिंबा काढत एनडीएतून बाहेर काढत 'सवता सुभा' मांडला. शिवाय, विशेष राज्याच्या मुद्यावरून पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारविरोधात अविश्वास ठराव देखील मांडला.

दुसरीकडे शिवसेनेनं देखील भाजपविरोधातील टीकेचा सूर आणखी 'तीव्र' केला असून संधी मिळेल त्या ठिकाणी शिवसेना भाजपवर टीकास्त्र डागत आहे. सध्या देशातील राजकीय वातावरण पाहता मित्र पक्षांची नाराजी भाजपला परवडेल का? हा देखील गहण मुद्दा आहे.

==============================


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 13, 2019 04:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...