Home /News /mumbai /

'संघातील अनेकांना लग्न केली नाही, त्यांच्यासाठी एक पॉलिसी बनवा', नवाब मलिकांचं वक्तव्य

'संघातील अनेकांना लग्न केली नाही, त्यांच्यासाठी एक पॉलिसी बनवा', नवाब मलिकांचं वक्तव्य

साक्षी महाराज म्हणतात खूप मुलं जन्माला घाला, मग यांना कुठली पॉलिसी?

  मुंबई, 12 जुलै : 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघात असलेल्या अनेकांनी लग्न केलेले नाही, त्यांना मुलं नाही. त्यांच्यासाठी एक पॉलिसी बनवा. साक्षी महाराज म्हणतात खूप मुलं जन्माला घाला, मग यांना कुठली पॉलिसी? असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलं आहे. त्यांच्या विधानावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलत असताना नवाब मलिक यांनी सहकार मंत्रालय आणि नाना पटोले यांनी केलेल्या पाळत ठेवण्याच्या विधानावर  आपली भूमिका मांडली. 'केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारमध्ये सहकार खात्याची निर्मिती झाली. यापूर्वी सहकार विभाग होता. सहकार हा विषय कृषी मंत्रालयाच्या ताब्यात होता. सहकार क्षेत्रातील व्यक्तींना धमकी दिली जात आहे. पण हा राज्य सरकारच्या अधीन हा विषय आहे. सहकारातील बँक क्षेत्र आरबीआय करते. त्यामुळे अमित शहा यांच्या नावाने धमक्या दिल्या जात आहेत, असा पलटवार मलिक यांनी केला.

  दिवसभर नवरा-बायकोचं भांडण, रात्री झाला खून, फरार पतीचा शोध सुरू

  तसंच,  'चोर के दाढी में तिनका' असं आशिष शेलार म्हणतात, मग दाढीवाला चोर कोण ? आशिष शेलार यांना  कुणाला दाढीवला म्हणायचे आहे? असं म्हणत मलिक यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. नाना पटोले यांच्यावर पाळत ठेवली जात नाही. जो नेता असतो त्याच्या माहिती गोळा केली जाते. नाना पटोले यांनी ही माहिती करून घ्यावी. आवश्यकता वाटली तर याबद्दलची माहिती काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्री यांच्याकडून घ्यावी त्यांना किंवा त्यांच्या नेत्यांना पोलीस बंदोबस्त नको असेल तर त्यांनी तसा अर्ज करावा, असा टोलाही मलिक यांनी पटोले यांनी लगावला. 3 जणांची हत्या केल्यानंतर तरुणाची आत्महत्या; 2 दिवसात भावाचीही सापडली सुसाइड नोट 'दोन अपत्य ही पॉलिसी 21 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आता हा दिंडोरा पिटत आहे. मुळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघात असलेल्या अनेकांनी लग्न केलेले नाही, त्यांना मुलं नाही. त्यांच्यासाठी एक पॉलिसी बनवा. साक्षी महाराज म्हणतात खूप मूल जन्माला घाला, मग यांना कुठली पॉलिसी?' असं वक्तव्यही नवाब मलिक यांनी केलं.
  Published by:sachin Salve
  First published:

  Tags: NCP

  पुढील बातम्या