राम मंदिरासाठी सरकारलाच अध्यादेश आणावा लागेल - आरएसएस

राम मंदिरासाठी सरकारलाच अध्यादेश आणावा लागेल - आरएसएस

राम मंदिराचा विषय न्यायालयाच्या अग्रक्रमात नाही, हे आश्चर्यकारक आणि वेदनादायक आहे.

  • Share this:

मुंबई, 2 नोव्हेंबर : राम मंदिर लवकरात लवकर झालं पाहिजे, यासाठी अध्यादेश काढण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पत्रकार परिषदेत केली आहे. राम मंदिराचा विषय न्यायालयाच्या अग्रक्रमात नाही, हे आश्चर्यकारक आणि वेदनादायक आहे असं म्हणत संघाचे सरकार्यवाहक भैय्याजी जोशी यांनी कोर्टाच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली.

‘आम्ही कायमच संविधानाचा आदर केला आहे. न्यायालयाच्या निर्णयांची कधी उपेक्षा केली नाही. आता न्यायालयानेही या विषयाचा पुनर्विचार करावा आणि याबाबत निर्णय द्यावा, अशी मागणीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केली आहे.

संघाच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे :

- आमची प्राथमिकता वेगळी आहे’ हे न्यायालयानं म्हणणं ही आमची वेदना

- दिवाळीपूर्वी आम्हाला काही शुभ समाचार मिळेल असा विश्वास होता. पण निर्णय येऊ शकला नाही हे दुर्दैव

- निर्णय प्रक्रिया लांबत आहे

- न्यायालय हिंदू समाजाच्या भावना लक्षात घेऊन निर्णय देईल, अशी अपेक्षा आहे

- गेल्या 30 वर्षांपासून आम्ही आंदोलन करतोय

- रामलल्ला केवळ दिवाळीतच नाही तर कायम आपल्या सर्वांच्या मनात

First published: November 2, 2018, 1:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading