Home /News /mumbai /

संघाचं मोठं पाऊल, मोहन भागवत साधणार मुस्लिम समाजातील व्यक्तींसोबत संवाद!

संघाचं मोठं पाऊल, मोहन भागवत साधणार मुस्लिम समाजातील व्यक्तींसोबत संवाद!

मुस्लिम समाजात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल जे गैरसमज आहे ते दूर करण्याच्या प्रक्रियेतील भाग म्हणून मोहन भागवत यांचा हा दौरा महत्वाचा आहे.

मुस्लिम समाजात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल जे गैरसमज आहे ते दूर करण्याच्या प्रक्रियेतील भाग म्हणून मोहन भागवत यांचा हा दौरा महत्वाचा आहे.

मुस्लिम समाजात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल जे गैरसमज आहे ते दूर करण्याच्या प्रक्रियेतील भाग म्हणून मोहन भागवत यांचा हा दौरा महत्वाचा आहे.

    मुंबई, 06 सप्टेंबर :  'भारतातील हिंदू (hindu) आणि मुस्लिम यांचा डीएनए (dna) एकच आहे' असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (rss) सरसंघचालक मोहन भागवत (mohan bhagwat) यांनी केलं होतं. आता संघाकडून नवी पाऊल पुढे टाकण्यात आले आहे. मोहन भागवत मुंबईमध्ये मुस्लिम समाजातील (Muslim community) अति विशिष्ठ आणि विद्याविभूषित व्यक्तींशी संवाद साधणार आहे. मोहन भागवत हे आज एका दिवसाच्या मुंबईत दौऱ्यात आहेत. आजच्या या दौऱ्यात एका पंचतारांकित हॉटेलमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात देशभरातील मुस्लिम समाजातील अति विशिष्ठ आणि विद्याविभूषित व्यक्तीसोबत ते संवाद साधणार आहेत. या परिसंवाद 300 अतिमहत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित राहतील. अद्भूत कलाकृती' तयार करणाऱ्या इंजिनीयरची देशभरात चर्चा; नमुना पाहून लोक हैराण! मागील महिन्यात मोहन भागवत यांनी भारतातील हिंदू आणि मुस्लिम यांचा डीएनए एकच आहे असं विधान केले होते. ही पार्श्वभूमी पाहता संघाबाबत मुस्लिम समाजात असलेला बघण्याचा दृष्टिकोन बदल व्हावा, याबाबत आवाहन भागवत करतील अशी शक्यता आहे. Share Market मध्ये पैसे गुंतवत असाल तर या'चुका कधीच करू नका; अन्यथा... विशेष म्हणजे, या बैठकीसाठी कुठल्याही संघटनेचे प्रतिनिधी नसतील, यात प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र निमंत्रण आहे. केरळचे माजी राज्यपाल मोहम्मद आरिफ, काश्मीर विद्यापीठाचे माजी कुलगुरू, लष्करातील माजी अधिकारी आदींचा समावेश असणार अशी माहिती समोर आली आहे. भागवतांचा हा कार्यक्रम संघासाठी महत्त्वाचा! मुस्लिम समाजात राष्ट्रीय स्वंय सेवक संघाबद्दल जे गैरसमज आहे ते दूर करण्याच्या प्रक्रियेतील भाग म्हणून मोहन भागवत यांचा हा दौरा महत्वाचा आहे. मुस्लिम समाजाशी संवाद ही संघाच्या नेहमीच्या संवाद प्रक्रियेचा एक भाग आहे. मोहन भागवत यांच्या आजच्या भाषणात पुढील मुद्दे प्रमुख असणार आहे. - संघाचे हिंदुत्व म्हणजे नेमके काय? - संघाच्या हिंदुत्वात भारतीय  मुसलमानांचे स्थान काय आहे? - संघाची हिंदू राष्ट्राची संकल्पना म्हणजे नेमकी काय आहे? - संघ भारतीय मुस्लिम समाजाबद्दल काय विचार करते ? - यावर मुद्दयावर मोहन भागवत यांचे भाषण केंद्रित असणार आहे. - राष्ट्रीत मुस्लिम मंचाने या कार्यक्रमाचे आयोजन केले - राष्ट्रीय मुस्लिम मंच ही संघ परिवारातील एक शाखा आहे भारतीय मुस्लिम समाजाला राष्ट्रीय स्वयसेवक संघासोबत जोडण्यासाठी 2002 मध्ये राष्ट्रीय मुस्लिम मंचाची स्थापना करण्यात आली. मोहमद अफझल हे या मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष असून इन्द्रेश कुमार हे या मंचाचे मार्गदर्शक आहे. मुस्लिम मंचात स्वयसेवक म्हणून काम करतात.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या