S M L

संघप्रणित राष्ट्रीय मुस्लिम मंचाची आज मुंबईत इफ्तार पार्टी, काही मुस्लिम संघटनांचा बहिष्कार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित मुस्लिम राष्ट्रीय मंचातर्फे आज मुंबईत इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलंय. सह्याद्री अतिथीगृहात हा कार्यक्रम पार पडणार आहे.

Sonali Deshpande | Updated On: Jun 4, 2018 07:44 PM IST

संघप्रणित राष्ट्रीय मुस्लिम मंचाची आज मुंबईत इफ्तार पार्टी, काही मुस्लिम संघटनांचा बहिष्कार

मुंबई, 04 जून : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित मुस्लिम राष्ट्रीय  मंचातर्फे आज मुंबईत इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलंय. सह्याद्री अतिथीगृहात हा कार्यक्रम पार पडणार आहे. यामध्ये अनेक मुस्लिम देशांचे राजदूतही सहभागी होणार आहेत. विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनाही मंचानं निमंत्रण पाठवलंय. काही मुस्लिम संघटनांनी या इफ्तार पार्टीवर घातलेला बहिष्कार मात्र कायम आहे.

गेल्या काही वर्षांपासून हा मंच इफ्तार पार्टीचं आयोजन करत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कट्टर प्रतिमा बदलण्यासाठी इफ्तारच्या माध्यमातून संघ प्रयत्न करत असतो.

संघाचे नेते इंद्रेश कुमारही  उपस्थित राहणार आहेत. ३० इस्लामिक देशातील वकिलातींचे अधिकारी आणि मुस्लिम समाजातील उच्चपदस्थांना कार्यक्रमासाठी निमंत्रण आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 4, 2018 09:46 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close