नागपूर हत्या-आत्महत्या प्रकरणात धक्कादायक माहिती उघड; आलोक YouTube वर पहायचा 'ते' VIDEO हा वृद्ध प्रवासी ट्रेनमधून खाली कोसळला आणि ट्रेनखाली जाणार इतक्यात रेल्वे स्थानकावर कार्यरत असलेल्या आरपीएफ जवान उमेश माळी यांनी त्यांच्या दिशेने धाव घेतली. उमेश माळी यांनी तात्काळ वृद्ध प्रवासी विजय पटेल यांना ट्रेनपासून दूर खेचले. यामुळे विजय पटेल या प्रवाशाचे प्राण वाचले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडीओ रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनीही आपल्या ट्विटरवर ट्विट केला आहे. हा फोटो ट्विट करत रेल्वेमंत्र्यांनी आरपीएफ जवानाच्या कार्याचे कौतुक केले आहे. रेल्वेमंत्र्यांनी म्हटलं, मला आरपीएफ कर्मचाऱ्यावर गर्व आहे ज्याने तात्काळ धाव घेत प्रवाशाचे प्राण वाचवले.सेवा और सुरक्षा को प्रतिबद्ध RPF: दादर, मुंबई में चलती ट्रेन से पैर फिसलने के कारण एक बुजुर्ग को RPF कर्मचारी ने अपनी सतर्कता से ट्रेन की चपेट में आने से बचाया।
मुझे RPF के कर्मचारियों पर गर्व है जिनके त्वरित एक्शन ने एक अमूल्य जीवन को बचाया। pic.twitter.com/NQszTZds1R — Piyush Goyal (@PiyushGoyal) June 24, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cctv footage, Mumbai