मुंबईत रेल्वे सुरक्षा रक्षकाने केला टॅक्सी चालकावर अनैसर्गिक अत्याचार

मुंबईत रेल्वे सुरक्षा रक्षकाने केला टॅक्सी चालकावर अनैसर्गिक अत्याचार

वेश्यावस्तीत जाण्यासाठी विरोध केल्याने मुंबईत एका टॅक्सी चालकावरच बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Share this:

मुंबई,13 जानेवारी:वेश्यावस्तीत जाण्यासाठी विरोध केल्याने मुंबईत एका टॅक्सी चालकावरच बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाने (आरपीएफ) हे कृत्य केल्याची माहिती समोर आहे. याप्रकरणी माता रमाबाई आंबेडकर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मिळालेली माहिती अशी की, ही घटना शनिवारी (11 जानेवारी) घडली. अमित धाकड असे आरोपीचे नाव आहे. आरोपीची शनिवारी रात्री 11 वाजता ड्युटी संपली. त्याने डीमेलो मार्गावर एका टॅक्सीचालकाला ग्रॅण्ट रोड येथील वेश्यावस्तीत नेण्यास सांगितले. मात्र, टॅक्सीचालकाने तिकडे जाण्यास नकार दिला. याचा राग आल्यामुळे आरोपी अमितने टॅक्सीचालकाला बेदम मारहाण केली. त्याला रेल्वेच्या हद्दीतील निर्जन स्थळी नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. बलात्कारानंतर आरोपीने पीडित क्सीचालकाकडील पैसे व टॅक्सीची चावीही हिसकावून घेतली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अमितला अटक केली आहे. या प्रकरणाची दखल घेत रेल्वे प्रशासनाने आरोपी जवान अमितला तडकाफडकी निलंबित केले आहे.

लेकीवर सगळ्यात जास्त माया करणाऱ्या बापानेच केला बलात्कार

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरात एक धक्कादायक प्रकरण समोर आले होते. बापानेच पोटच्या लेकीवर बलात्कार केल्याची घटना घटली. अवघ्या 7 वर्षीय मुलीवर तिच्याच वडिलांनी बलात्कार केला. या घटनेमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

7 वर्षीय चिमुकलीवर तिच्याच वडिलांकडून बलात्कार करण्यात आला आहे. पत्नीच्या सतर्कतेमुळे हा गंभीर प्रकार उघड झाला आहे. पत्नीकडून नराधम पतीविरुद्ध लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास केल्यानंतर पोलिसांनी आरोपी नराधम बापाला बेड्या ठोकल्या असून पुढील तपास सुरू आहे.

देशात गेल्या काही दिवसांपासून वारंवार महिला अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. त्यात जर मायेचा हात फिरवणाऱ्या बापानेच असा प्रकार केला तर मुली घरातही सुरक्षित नाही असं म्हणावं लागेल. घरातील वडिलच जर लेकीवर असा अत्याचार करत असेल तर मुलींनी कुठे जावं हा मोठा प्रश्न आहे. या सगळ्यामुळे संतप्त नागरिकांनी नराधमाला बेदम चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 13, 2020 12:41 PM IST

ताज्या बातम्या