डोंबिवली गुलाबांच्या सुवासाने दरवळली; बालभवनमध्ये 'रोझ फेस्टिव्हल'चं आयोजन

डोंबिवली गुलाबांच्या सुवासाने दरवळली; बालभवनमध्ये 'रोझ फेस्टिव्हल'चं आयोजन

विशेष म्हणजे ८०० वर्ष जुना आणि चहात वापरला जाणारा चीनी गुलाब, मोदी गुलाब हे देखील या प्रदर्शनाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे.

  • Share this:

04 फेब्रुवारी : डोंबिवलीत सध्या चं आयोजन करण्यात आलं आहे. डोंबिवलीचे आमदार आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून डोंबिवलीच्या बालभवनात हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. या प्रदर्शनात तब्बल ३५० प्रकारचे विविध जातींचे आणि आकाराचे गुलाब पाहायला मिळणार आहेत. गुलाब हे प्रेमाचं प्रतिक आहे. त्यामुळे त्यांचा सुगंध घेण्यासाठी आणि वेगवेगळ्या गुलाबांच्या जातींना पाहण्यासाठी तरुणांनीही गर्दी केली आहे.

विशेष म्हणजे ८०० वर्ष जुना आणि चहात वापरला जाणारा चीनी गुलाब, मोदी गुलाब हे देखील या प्रदर्शनाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे.

डॉक्टरकीचा पेशा सांभाळून गुलाबांच्या प्रेमापोटी गुलाबांची शेती आणि संशोधन करणारे डॉ. विकास म्हसकर आणि वांगणीचे मोरे बंधू यांनीही त्यांचे अनेक प्रकारचे नवीन गुलाब या प्रदर्शनासाठी उपलब्ध करून दिलेत. त्यामुळे मन प्रसन्न करणारे हे गुलाब पाहण्यासाठी डोंबिवलीकर गर्दी करतायत.

First published: February 4, 2018, 8:56 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading