मुंबईत रूफटॉप हॉटेल्सला पालिका आयुक्तांची परवानगी

मुंबईत रूफटॉप हॉटेल्सला पालिका आयुक्तांची परवानगी

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजॉय मेहता यांनी गच्चीवरच्या हॉटेल्सना परवानगी देणारं परिपत्रक काढलंय.

  • Share this:

मुंबई,02 नोव्हेंबर: मुंबईत लवकरच रुफटॉप हॉटेलमध्ये जेवता येणार आहे. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजॉय मेहता यांनी गच्चीवरच्या हॉटेल्सना परवानगी देणारं परिपत्रक काढलंय.

मुंबईत गच्चीवर हॉटेल सुरू करणं तितकसं सोपं नसणार आहे. कारण रूफ टॉप हॉटल्सला जरी परवानगी दिली असली तरी यामध्ये अनेक अटी टाकण्यात आल्या आहेत. म, 10 मीटरच्या अंतरात रहिवासी इमारत नको. गच्चीवर स्वयंपाकघर चालणार नाही, ते खालीच मांडावं लागणार. तसंच, शौचालयही गच्चीवर नाही, खालच्या मजल्यांवर त्याची सोय करावी लागेल. पण खरा गोंधळ तर पुढे आहे. हा प्रस्ताव सभागृहात आणण्याचा शिवसेनेचा प्रस्ताव होता. कारण सुधार समितीनं हा प्रस्ताव नाकारला होता. पण सेनेनं सभागृहात आणण्याआधीच आयुक्तांनी परिपत्रक काढून गोंधळात भर टाकलीय.

त्यामुळे आता परिपत्रक तर काढलंय पण खरी रूफ टॉप हॉटेल्स कधी अस्तित्वात येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First published: November 2, 2017, 8:52 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading