मनोरा आमदार निवासाचं छत कोसळलं

मनोरा आमदार निवासाचं छत कोसळलं

आमदार सतीश पाटील यांच्या रूम नं. 112 मधील पीओपी कोसळलंय. आमदारांच्या अँटी चेंबर मध्ये असलेलं हे छत कोसळल्याने खोलीतल्या फॅनसहित छत खाली कोसळलंय.

  • Share this:

31 जुलै : मुंबईतल्या नरिमन पाॅईंट परिसरातील आमदारांचं निवासस्थान असलेल्या मनोरा आमदार निवासात छत कोसळल्याची घटना घडलीय. आमदार सतीश पाटील यांच्या रूम नं. 112 मधील पीओपी कोसळलंय. आमदारांच्या अँटी चेंबर मध्ये असलेलं हे छत कोसळल्याने खोलीतल्या फॅनसहित छत खाली कोसळलंय.

आमदार पाटील मात्र सुट्टीनिमित्त गावी गेलेले असल्याने या खोलीत कुणीच नसल्याने ते बचावलेत. आज पहाटे त्यांनी परत येऊन खोलीचा दरवाजा उघडल्यावर छत कोसळून खाली पडल्याचं त्यांच्या निदर्शनास आलंय.

मनोरा आमदार निवास जुनं झालं असून त्याची डागडुजी करण्याची मागणी पावसाळी अधिवेशनातही करण्यात आली होती.

First published: July 31, 2017, 11:14 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading