Home /News /mumbai /

LIVE मुंबईत अंधेरी MIDC मधल्या इमारतीला भीषण आग; 5 तासांपासून भडकलेली आग अखेर नियंत्रणात

LIVE मुंबईत अंधेरी MIDC मधल्या इमारतीला भीषण आग; 5 तासांपासून भडकलेली आग अखेर नियंत्रणात

मुंबईतल्या वर्दळीच्या अंधेरीतल्या MIDC मध्ये एका कंपनीला भीषण आग लागली आहे. तब्बल पाच तास आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.

    मुंबई 13 फेब्रुवारी : मुंबईतल्या वर्दळीच्या अंधेरीतल्या MIDC मध्ये एका कंपनीला भीषण आग लागली आहे. तब्बल साडेपाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर हळूहळू आग नियंत्रणात आली आहे. इथे असणाऱ्या रोल्टा टेक्नॉलॉजी पार्क या  इमारतीला ही आग लागली आहे. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली आणि तिथून सगळीकडे पसरली. इथल्या सर्व्हर रुमला ही आग लागली आहे. level 4 ची ही आग असल्याचं फायर ब्रिगेडने सांगितलंय. जवळपास 25 गाड्या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न करत आहेत. पण चार तास झाले तरी अद्याप आग भडकलेली आहे. इमारतीतल्या सगळ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं असून मध्ये कोणी अडकून राहिलेलं नाही याचीही खात्री अधिकारी करत आहेत. आगीच्या धुराने गुदमरल्यामुळे काही जणांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. आगीचा धूर सर्व इमारतीत पसरला असून जावानांना आगीवर नियंत्रण मिळवताना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. आग ही सर्व्हर रुमला लागली असल्यामुळे ती झपाट्याने पसरते आहे  त्यामुळे जवान जास्त काळजी घेत आहेत. या आगीत किंवा धुरात कुणी अडकलं नाही ना याची तपासणी सुरू आहे. एका जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. धूर कोंडल्याने तिचा जीव गुदमरला. आता साडे पाच तासांनंतर आग आटोक्यात येत आहे. ही कंपनी बंद असल्याने मोठा अनर्थ टळला. फारसे कर्मचारी या इमारतीत नव्हते. जवानांनी अथक साहसाने अडकलेल्यांना बाहेर काढलं.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    पुढील बातम्या