Home /News /mumbai /

मंदिरं उघडण्यावरून पेढे वाटणाऱ्या भाजप नेत्यांना रोहित पवारांचा टोला, म्हणाले....

मंदिरं उघडण्यावरून पेढे वाटणाऱ्या भाजप नेत्यांना रोहित पवारांचा टोला, म्हणाले....

आज पाडव्यापासून राज्यातील मंदिरं उघडण्यात आली आहे. ठिकठिकाणी भाजप नेत्यांकडून मंदिरांमध्ये महापूजा करून आंनदोत्सव साजरा करण्यात आला आहे.

    मुंबई, 16 नोव्हेंबर : कोरोनाच्या (Corona) परिस्थितीमुळे 8 महिन्यांपासून बंद असलेली मंदिरं अखेर उघडण्यात आली आहे. भाजपने (BJP) हा आपल्या आंदोलनाचा विजय असल्याचा सांगत जल्लोष सुरू केला आहे. पण, 'हा विजय कोरोनाला रोखण्यासाठी सहकार्य करणारी आध्यात्मिक-धार्मिक क्षेत्रातील मंडळी, भाविक व जनतेचा आहे', असं म्हणत राष्ट्रवादीचे (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजपला टोला लगावला. आज पाडव्यापासून राज्यातील मंदिरं (Temples) उघडण्यात आली आहे. ठिकठिकाणी भाजप नेत्यांकडून मंदिरांमध्ये महापूजा करून आंनदोत्सव साजरा करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी ट्वीट करून भाजप नेत्यांना फटकारले आहे. 'धार्मिक स्थळं उघडल्याचं श्रेय भाजपने पेढे वाटून घेत असल्याचं मला पत्रकारांनी सांगितलं. पण योग्य वेळी हा निर्णय घेणारं सरकार आणि कोरोनाला रोखण्यासाठी सहकार्य करणारी आध्यात्मिक-धार्मिक क्षेत्रातील मंडळी,भाविक व जनतेचा हा विजय आहे. भाजपने नेहमीप्रमाणे इथंही श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये' असा टोला रोहित पवार यांनी लगावला. आज सकाळी रोहित पवार यांनी कर्जतचं ग्रामदैवत सद्गुरु संत श्री. गोदड महाराज, राशीनला जगदंबा देवी आणि सिद्धटेकला गणरायाची भाविक आणि कार्यकर्त्यांसह मनोभावे पूजा आणि आरती केली. यावेळी 'धार्मिक स्थळं उघडल्याने या परिसरातील व्यवसायांनाही चालना मिळेल. पण कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांकडे कुणीही दुर्लक्ष करु नये' अशी विनंतीही रोहित पवार यांनी केली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जल संसाधन मंत्री जयंत पाटील यांनीही भाजपवर मंदिरं उघडण्याच्या श्रेयावरून चांगलीच टीका केली आहे. 'भाजपाला मंदिर उघडण्याच्या श्रेय जाऊ शकत नाही कारण की, लॉकडाउनच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासूनच धार्मिक स्थळे बंद ठेवा असे, खाली आदेश आले होते. राज्यात ठीकठिकाणी कोरोना रुग्ण आहे. हे कसे  कमी करावे यासाठी आमचे सरकार प्रयत्न करत आहे. यामुळे प्रत्येक गोष्टी हळूहळू उघडण्याच्या आमचा प्रयत्न होता म्हणून आधी रेल्वे चालू झाली त्यानंतर इतर व्यवसाय चालू झाले. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात प्रार्थनास्थळे चालू करण्यात आली आहे. मात्र, भारतीय जनता पक्षाला फक्त प्रत्येक गोष्टींमध्ये राजकारण करायचं असतं' असा टोला जयंत पाटील यांनी लगावला. मोठी बातमी! ख्रिसमसपूर्वीच मिळणार खूशखबर; महिन्याभरात कोरोना लस यायची शक्यता 'याच भारतीय जनता पक्षाने काही महिन्यापूर्वी मंदिराच्या बाहेर जाऊन थाळी वाजवा आंदोलन केले. मात्र, कशाप्रकारे कोरोना रुग्ण कमी होतील यासाठी त्यांचे काही सल्ले, सूचना असतील तर मी हे समजू शकत होतो', असंही पाटील म्हणाले. 'आम्ही विरोधी पक्षात असून सुद्धा केंद्राचे प्रत्येक मार्गदर्शन सल्ले आम्ही ऐकले. कोरोनाची महामारी पूर्ण जगात आली आहे. या महामारीच्या विरुद्ध लढताना कुठल्याही प्रकारे राजकारण करायचा नाही हे आमचे सरकारने निश्‍चित केले होता. मात्र. भाजपला प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचे असते. यामुळे भाजपाला मंदिर उघडण्याच्या श्रेय जात नाही, उलट गुढीपाडव्याच्या दिवशी मंदिरे खुले करण्याच्या श्रेय मुख्यमंत्री आणि राज्य सरकारला जाते', असंही पाटील म्हणाले.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या