मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /कल्याण: पोलीस स्टेशन परिसरातच दुकानावर दरोडा; भामट्यांनी शटर उचकटून ऐवज लांबवला

कल्याण: पोलीस स्टेशन परिसरातच दुकानावर दरोडा; भामट्यांनी शटर उचकटून ऐवज लांबवला

Crime in Kalyan: कल्याण परिसरात चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. काल रात्री देखील येथील एका किराणा दुकानावर दरोडा  टाकल्याची घटना उघडकीस आली आहे.

Crime in Kalyan: कल्याण परिसरात चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. काल रात्री देखील येथील एका किराणा दुकानावर दरोडा टाकल्याची घटना उघडकीस आली आहे.

Crime in Kalyan: कल्याण परिसरात चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. काल रात्री देखील येथील एका किराणा दुकानावर दरोडा टाकल्याची घटना उघडकीस आली आहे.

कल्याण, 10 सप्टेंबर: राज्यात लॉकडाऊन हटवल्यापासून विविध गुन्हेगारीचं प्रमाण अचानक वाढलं आहे. चोरी, दरोडा, खून आणि बलात्कार अशा विविध गुन्ह्याच्या घटना समोर येत आहे. मुंबईनजीक असणाऱ्या कल्याण परिसरात चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. रात्रीच्या सुमारास दुकानं आणि घरफोड्याचं प्रमाण वाढवलं आहे. काल रात्री देखील याठिकाणी एका किराणा दुकानावर दरोडा टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी दुकानाचं शटर उचकटून दरोडा टाकला असून दुकानातील मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा  पुढील तपास पोलीस करत आहेत.

काल रात्रीच्या सुमारास कल्याण पश्चिमेतील जुन्या फिश मार्केट परिसरात साजीद तांबोळी यांच्या दुकानावर दरोडा टाकण्यात आला आहे. चोरट्यानं रात्रीच्या सुमारास संधी साधत, दुकानाचं शटर उचकटून आत प्रवेश केला आहे. चोरट्यानं दुकानाच्या काही भींतीदेखील फोडल्या आहेत. यामध्ये तांबोळी यांच्या दुकानाचं बरंच नुकसान झालं आहे. दरोडेखोरानं दुकानातील 4 हजार रुपयांची रोकड आणि काही किंमती ऐवज लंपास केला आहे.

हेही वाचा-...म्हणून महिला पोलिसानेच हवालदाराला संपवलं; मुंबईला हादरवणाऱ्या घटनेत नवं वळण

या प्रकरणी दुकानदार साजीद तांबोळी यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे. ही घटना कल्याण पश्चिमेतील जुन्या फिश मार्केट परिसरातील रफी अहमद किडवाई मार्ग याठिकाणी घडली आहे. विशेष म्हणजे येथून काही अंतरावरच पोलीस ठाणे आहे.

First published:
top videos

    Tags: Crime news, Kalyan, Robbery