ठाण्यात रेल्वेतून वर्षभरात ३००२ मोबाईल चोरीला!

ठाण्यात रेल्वेतून वर्षभरात ३००२ मोबाईल चोरीला!

ठाणे रेल्वे स्थानकात असाल तर जरा सावधान! तुमचाही मोबाईल चोरीला जावू शकतो. कारण ठाण्यात रेल्वेतून वर्षभरात ३००२ मोबाईल चोरीला गेल्याची आकडेवारी समोर आली आहे.

  • Share this:

19 जानेवारी : ठाणे रेल्वे स्थानकात असाल तर जरा सावधान! तुमचाही मोबाईल चोरीला जावू शकतो. कारण ठाण्यात रेल्वेतून वर्षभरात ३००२ मोबाईल चोरीला गेल्याची आकडेवारी समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातले फक्त १० टक्के गुन्हे उघड झालेत. ही आकडेवारी पाहता ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या दररोज सरासरी 8 ते 9 मोबाईल चोरीला जात असल्याचं समोर आलं आहे. पण या चोरांच्या मुसक्या आवळायचं तर सोडाचं पण हरवल्याची प्रकरणंच उघडकीस आलेली नाही.

ठाण्यात चोरीला जाणाऱ्या बहुतांश मोबाईल्सचं लोकेशन परराज्यात असल्याचंही निदर्शनास आलं आहे. तर काही मोबाईल्सचे सुटे भाग विकले जात असल्याचंही उघडकीस आलं आहे. ठाणे लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीतून चोरीला गेलेल्या 3 हजार 2 मोबाईल्सची किंमत 4 लाख 95 हजार 386 रुपये इतकी आहे.

मोबाइल लंपास करणारे अनेकवेळा नशेखोर असल्याचंही सांगण्यात येत आहे. ठाणे लोहमार्ग पोलिसांची हद्द कोपरी पुलापासून दिवा स्थानक ते दिव्यापासून निळजेपर्यंत आहे. ठाणे स्थानकातून दररोज ६ ते ७ लाख प्रवासी रेल्वेनं प्रवास करतात. मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांची यापूर्वी मिसींगमध्ये नोंद केली जात होती. पण जून २०१७ पासून चोरीला जाणाऱ्या मोबाईलबाबत थेट एफआयआर नोंदवण्यास सुरूवात झाली आहे. चोरी थांबेल की नाही हे सांगू शकत नाही पण आपल्या मौल्यवान सामानाची आपणच काळजी घ्या.

First published: January 19, 2018, 9:57 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading